
0
4
0
9
0
3
इलक्षण
एक दिवस घरापुढं भोंगा वाजला जोरात
म्या म्हनलं बायकोले, कोणाची व्हय वं वरात
बायको म्हणे-वरातीत नवराही नाही न् नवरीही नाही
पांढऱ्या कपडेवाल्यायची दिसते लगीनघाई
काय भानगड आहे म्हणून निघालो पाहाले
तसे दोघं-तिघं आले नमस्कार कराले
माह्या मनात इचार आला, मी काही नेता नाही
मंग ह्या लोकायचा नमस्कार कशापायी?
बंद करू भारनियमन, नियंत्रण ठेवू महागाईवर
शब्द त्यायचे ऐकून, आलो दादा भानावर
तुमच्या घरापुढचा रस्ता दुरूस्त करू
आन् नळाले पाणी बी भरपूर सोडू
तुम्ही फक्त एकच करा, आमच्याच चिन्हावर ठप्पा मारा
अन् मंग पाहा योजनांचा पाऊस पडेल भराभरा
तवा उघडले डोळे आन् लक्षात आलं चटकन्
पाच वर्ष झाले भाऊ आता आलं ‘इलक्षण’
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर
0
4
0
9
0
3





