Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरबीडसाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील बालरचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 4

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : फजिती📘*
*🔸मंगळवार : २७ / मे /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*फजिती*

ऊंटाने मैत्री
गाढवाशी केली
मैत्री त्यांची
घट्ट झाली ।।

एक दिवस….
ऊंट बोलला…
शेतातील ऊस
गोड झाला ।।

चल जाऊ
पार्टी करू
गोड ऊसावर
ताव मारू। ।

बारी बारीने
ऊस खाऊ
एक जन खाऊ
दुसर्‍याने लक्ष ठेवू ।।

गाढवाने लावला
पहिला नंबर
त्याने खाल्ले
ऊस पोटभर ।।

जेव्हा ऊंट पोट
लागला भरू
गाढव लागला
केकाट्या मारू ।।

शेत मालक
आला धावत
ऊंटाला बाहेर
काढले बदडत। ।

ऊंटाची पक्की
फजिती झाली
बोलला…मूर्खाशी मैत्री
जीवाशी आली…. ।।

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*फजिती*

खेळायला निघाला
सुट बूटात बंटी
आभाळ भरून आले
वाजली पावसाची घंटी

नको जाऊ बाहेर
आई आतून ओरडली
आवाज ऐकून
बंटीने धुम ठोकली

रपरप पाऊस
विजांचा कडकडाट
बंटी घाबरला
ऐकून गडगडाट

आई आई म्हणून
रडायला लागला
पळता पळता
धपकन पडला

ओलाचिंब बंटी
चिखलात भरला
कसाबसा उठून
चालायला लागला

ऐकावे मोठ्यांचे
त्याला समजले
फट फजिती ने
त्याला समजावले

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*फजिती*

एकदा माझ्या दारात
आला एक हत्ती
दारात होता अंधार
आईने पेटवली मेणबत्ती

आजी आई दोघी
आल्या फळं घेऊन
केळी खाल्ली हत्तीने
डुलत डुलत येऊन

फजिती पाहून हत्तीची
मला हसायला आले
केळी खाऊन पिकलेली
पोट किती मोठाले झाले

सोंड हलवतो हत्तीदादा
डोळे इवले इवले मस्त
आठ दहा पिवळी केळी
लगेचच केली फस्त

आई आजी हसल्या छान
हत्ती मग गेला निघून दूर
हत्ती हत्ती तुला पाहताना
आज मजा आली भरपूर

*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*फजिती*

एकदा ससोबाला केला
जंगलचा डाॅक्टर
दुजोरा प्राण्यांचा मिळाला
दिले औषध कडू फार ॥१॥

तपासाला आले भित्रे ससोबा
पुढे येऊन कोल्होबा
बोलले तोबातोबा
मला तपासा आधी ससोबा ॥२॥

ऐकून हृदयाची धडधड
उडाला ससोबा तिनताड
मोडली त्याची हाड
आवाज आला काडकाड ॥३॥

इटुकले पिटुकले कान
लागले घाबरून थरथरू
वरून पडले झाडाचे पान
पडले हृदय मी काय करू ॥४॥

झाली ससोबाची फजीती
भन्नाट आयडिया कोल्होबाची
नामी होती किती
झाली पळता भुई ससोबाची ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*फजिती*

जंगलच्या राजाचे ठरले लग्न ,
सारे जंगल तयारीत मग्न
काजव्यांनी केली रोशनाई
कावळ्याने वाजवली शहनाई

कोकिळेने केले सुंदर गायन,
ऐटबाज झाले मोराचे नर्तन,
नागोबाने स्वतःचा केला झोपाळा,
वधू-वराने घेतला त्यावर हिंदोळा

सगळ्या फुलांनी शोभा वाढवली,
सोबत सुवासाची अत्तरे शिंपडली ,
सुगरणीने खोप्यांची झुंबरे अडकवली,
गुलाब ,मोगरा हारात जाऊन बसली

मनीमाऊने बनवली चवदार खीर,
चपात्या बनवून दमला उंदीर,
वरातीत वनराज हत्तीवर स्वार,
बागळोबा भटजी घेऊन आले हार

लग्न घटिका जवळ आली
,सुंदर सिंहीण नवरी झाली,
अतिशबाजी नाही मग नवरी रुसली
लखलखत मग बिजली आली ,

गर्जत गर्जत आला वरूण राजा,
आता सगळ्यांचा वाजला बाजा
वनमंडपात मग धांदल उडाली
मंगलाष्टका पळत पळतच झाली,

लग्नाची गोड मेजवानी मग
सगळ्यांनी गुहेत जाऊन खाल्ली
जंगलात वनराजाच्या लग्नाची
अशी सगळ्यांची फजिती झाली.

*काझी शबनम मुबारक*
*आष्टी जिल्हा बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*फजिती*

आताच्या सारखे तवा कुठं रोड
नव्हत्या कसल्या गाड्याघोड्या
पायपीट करत जावं लागायचं
पांदण,पायवाट रस्त्याने उड्या

उन्हाळा असोत वा पावसाळा
पायात लखानी स्लीपर असे
अनवाणी पायी चालण्यापेक्षा
तिचाच रुबाब लय भारी दिसे

पावसात मात्र फजिती व्हायची
चप्पल ही चिखलाने माखायची
पीचपीच व्हायचा रस्ता सगळा
पाठीमागून डिझाईन बनायची

पाय उचलता दुसरा फसायचा
जोरात काढता चिखल उडायचा
चिखलाने जाई अंग सारं भरून
त्यातच चप्पलचा बेल्ट तुटायचा

शाळेत जायचं अनवाणी पायाने
घरी येतांना पाय भरत चिखलाने
उड्या मारत साचलेल्या पाण्याने
आई डोळे वटारून पाही रागाने

अशी आमची फजिती व्हायची
गेले ते दिवस राहिल्या आठवणी
फजितीत ही मज्जाच वाटायची
उन्मळून येई बालकाव्य रूपानी

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*फजिती*

एक होती म्हातारी
बिलंदर, कावेबाज भारी
गावाबाहेरच्या घरी
एकटीच होती बिचारी ||१||

घरकुल तिचे वाडीत
चंद्रमौळी झोपडीत
अंगणाच्या वेशीत
बोरांची झाडे वाढित ||२||

रोज पहाटे समयी
अंगणी गोड बोरांचा सडा
विकायला घेऊन जाई
गावोगावी, वाडी-पाडा ||३||

अचानक एक दिस
आक्रीत घडले
अंगणातले बोरं
गायबच झाले ||४||

झोपडीच्या उंबऱ्याशी
कुणीतरी केली ‘शी’
”कुणाची करणी ही दाराशी?
लाज नाही मुळी कशी?”||५||

अचंबित म्हातारी
बोरांचाच विचार करी
बैसली दडून घरी
रात्रीची टेहळणी करी ||६||

मध्यरात्री आला कोल्होबा
बोरे खाल्ली बकाबका
‘काम’ आपले उरकून बा
सैरभैर… कुणी पाहिले का? ||७||

चिडून गेली म्हातारी
“शिक्षा काय करावी बरी?
कोल्ह्याने येऊच नये दारी
अद्दल अशी घडवू भारी !” ||८||

जाहला मध्यरात्रीचा प्रहर
कोल्ह्याचा नित्याचा सफर
म्हातारीही होतीच तयार
खोड त्याची आज जिरणारं ||९||

कोल्ह्याने केला पोटोबा
लबाड सवयीवर नव्हताच ताबा
म्हातारीचा होता दाराआड दबा
तापल्या तव्याचा ,नामी उपाय.. तोबाsss ||१०||

कोल्ह्याने ढुंगण टेकताच दारी
दारा खालून आली तापल्या तव्याची स्वारी
चटक्.. चट्, चट्, चट्.. भाजलेय भारी
कुईss..कुईss..कुईss..कुईss.. फजितीच सारी ||११||

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿
*फजिती*

गडगड गडगड मेघ गरजले
कडकड कडकड विज चमकली
सरसर सरसर सरी बरसल्या
टपटप टपटप गारा पडल्या ॥

सो-सो , सो -सो वारा वाहिला
फडफड फडफड टिना वाजल्या
सोसाटयाचे वादळ उठले
छप्पर घराचे उडू लागले ॥

खाट आजीची बुडू लागली
ताई माझी रडू लागली
आई सामान काढू लागली
निसर्गाने मात्र फजिती केली ॥

आजोबांना घेऊन खाट उचलली
ताई अन् आईची समज काढली
बाबांची युक्ती कामी आली
संकटातून धिराने वाट काढली ॥

*सौ. सरला टाले*
*राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖〽️🔖➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे