बेला ग्रामपंचायत अंतर्गत चार आरो फिल्टर कित्येक दिवसापासून बंद
प्रतिनिधी; अखिल रोडे
बेला ग्रामपंचायत अंतर्गत चार आरो फिल्टर कित्येक दिवसापासून बंद
प्रतिनिधी; अखिल रोडे
बेला;- उमरेड तालुक्यातील बेला ग्रामपंचायत अंतर्गत येणारे वॉटर फिल्टर खूप दिवसापासून बंद
असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पदरात मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत. या पाणी फिल्टरवर लाखो रूपये खर्च केले गेले मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.
उमरेड तालुक्यातील सर्वात मोठी बेला ग्रामपंचायती अंतर्गत 4 वर्षापूर्वीच वॉटर फिल्टर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यातील काही मशीन ग्रामपंचायत कार्यालयात जवळ लावण्यात आल्या तर काही मशीन गावात इतर ठिकाणी लावण्यात आल्या. ग्रामपंचायतकडून पाच ते दहा रुपयांत १५ लिटर पाणी नागरिकांना उपलब्ध करून दिले जात होते. परंतु, ही सुविधा आता निकामी ठरली आहे. अशी ओरड बेला गावकऱ्यांची आहे
बेला ग्रामपंचायत कार्यालयात अंतर्गत लावण्यात आलेल्या मशीनला पाणी उपलब्ध आहे, काही ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्याने तर काही ग्रामपंचायतला निधी उपलब्ध असून सुद्धा अनेक कारणास्तव ह्या मशीन बंद अवस्थेत केवळ बेला ग्रामपंचायत कार्यालयाची व बेला गावाची शोभा वाढवत आहेत. अनेक ठिकाणी गावात लावण्यात आलेल्या मशीनचे काम योग्यरित्या करण्यात आले नाही. मशीन बसविताना ठेकेदाराने सदोष काम करण्यात आले नाही यामुळे काही दिवसांतच ह्या मशीन जमीनदोस्त झाल्या तेव्हापासून या मशीनकडे दुर्लक्ष करण्यात आले. ह्या मशीन उपयोगात नसल्यामुळे या गावातील नागरिकांना आता खाजगी ठिकाणी २० लिटर पाणी २५ रुपयांत विकत घ्यावे लागत आहे. गावातील काही जलस्रोताचे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळेच वॉटर फिल्टरची सोय करून देण्यात आली होती.
परंतु ग्रामपंचायतीला ही टिकवता आली नाही. मशीन दुरुस्ती किंवा इतर उपाययोजना करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. नागरिकांच्या आरोग्याचा, आर्थिक प्रश्न असताना ग्रामपंचायतीला काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसते. दुरुस्ती केल्यास या मशीन उपयोगात आणता येऊ शकतात. वास्तविक फिल्टर मशीनचे काम सुरू असताना ग्रामसचिवांनी व सरपंच मोहदययांनी लक्ष घालणे अपेक्षित होते परंतु त्यांनी याची तसदी घेतल नाही. आताही याविषयी गांभीर्य दाखविले जात नाही, या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
*बेला ग्रामपंचायत अंतर्गत गावातील चार ही फिल्टर* *मशीन बंद अवस्थेत*
वॉर्ड नो एक बसस्टँड जवळ,वॉर्ड क्र 2 बेसिक शाळा जवळ, माजी सरपंच सुभाष तेलरांध्ये यांच्या घरा जवळ, लोक जीवन शाळा जवळ या बेला ग्रामपंचायत अंतर्गत फिल्टर मशीन बंद अवस्थेत आहेत.
बेला ग्रामपंचायत अंतर्गत आरो फिल्टर मशीन बंद असतील तर दोन दिवसात तातडीने दुरुस्ती करण्याकरिता बोलावून त्यांच्या त्या संदर्भातील समस्या जाणून त्यावर लवकरच त्यांना दुरुस्तीचे आदेश देण्यात येतील व या फिल्टर मशीन दुरुस्त झाल्यावर नागरिकांना शुद्ध व थंड पाण्याचा त्याचा लाभ घेता येईल
विवेक बोरसे
ग्राम विकासधिकारी
बेला गावातील फिल्टर मशीन खूप दिवसा पासून बंद अवस्थेत आहे याचे कारण काय ? आम्हाला 5 रुपयात 10 ते 15 लिटर आरो चे शुद्ध व थंड पाणी मिळत होते पण आता आम्ही खाजगी फिल्टर चे पाणी 30 रुपयात घ्यावे लागतात गावातील लोकांना व मार्केट मध्ये बेला ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता फिल्टर मशीन लावल्या की गावाची शोभा वाढवयाला बेला ग्रामपंचायत ने लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देऊन फिल्टर मशीन सुरू कराव्या!
श्री प्रकाश गवते*
बेला गावकरी





