Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

श्रीगोविंद प्रभू व श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन उत्सव सोहळा संपन्न!

रजत डेकाटे- प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

श्रीगोविंद प्रभू व श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन उत्सव सोहळा संपन्न!

रजत डेकाटे- प्रतिनिधी

नागपूर : “सर्वधर्मसहिष्णूता हे श्रीचक्रधर स्वामींचे सूत्र आहे. इथे जाती कुळ नाही. खुंट दावे नाही. श्रीचक्रधर स्वामी हे रंजल्या गांजल्या पिढीतांचे उद्धारक होते” असे प्रतिपादन प्रा डॉ कोमल ठाकरे प्राध्यापक तायवाडे कॉलेज महादुला, कोराडी, नागपूर यांनी केले. ते स्वामीदर्शन महानुभाव मंडळ व महदाईसा महिला महानुभाव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीगोविंद प्रभू व श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवा प्रसंगी विशेष अतिथी म्हणून बोलत होते. “श्रीचक्रधर स्वामींनी आठशे वर्षांपूर्वी प्रतिपादिलेले विचार, तत्व जर आजही आपल्या अंगी बाणत नसतील तर ते आपल्यासाठी नक्कीच गौरवास्पद नाही” असेही त्यांनी विशद केले.

संताजी सभागृह, सोमवारी क्वार्टर, बुधवार बाजार, नागपूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू.प.महंत श्री.विश्वनाथबाबा कपाटे संचालक महानुभाव आश्रम श्रीक्षेत्र मनसर हे होते, तर उद्घाटक म्हणून प.पू.प.महंत श्री.देईगावकर बाबा आठवा मैल, नागपूर हे लाभले होते.
याप्रसंगी उद्घाटक महंत देईगावकर बाबा, विशेष अतिथी म्हणून पूज्य ई.श्री. आशुतोष शास्त्री वाइंदेशकर, श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम कुरकुटवाडी, तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर, पूज्य ई.श्री. प्रणवदादा खंदारकर, मनसर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प.पू.प.महंत श्री. चिरडेबाबा देवळी, प.पू.प.महंत श्री.अरण्यग्रामकर बाबा नागपूर यांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रा डॉ वनिता राष्ट्रपाल मेश्राम यांनी मानव्य विद्याशाखे अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पीएच डी पदवी प्राप्त केल्याबद्दल मंडळाचे वतीने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीचा वसा सांगत भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्तींचे परिचय वाचन कोमल बोरकर यांनी केले. या कार्यक्रमात महानुभाव समाजकार्य फाउंडेशन द्वारा “श्रीचक्रधर स्वामींचा सामाजिक दृष्टिकोन” या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्या श्रेया वंजारी, तेजस बनसोड, नैतिक वासनिक, वैष्णवी गावंडे, प्रतीक्षा बलकी या विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल शेंडे यांनी केले. संचलन मनोज बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहल गजभिये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र कपाटे, प्रभाकर बोरकर, ताम्रध्वज खोब्रागडे, नामदेव निमगडे, वसंत अडकणे, प्रभाकर चंदनखेडे, पुष्पा मोटघरे, भूपेश शेंडे, राजेंद्र डोंगरे, अक्षय बोरकर, श्रद्धा चौधरी, छाया कलासुवा, गुणवंत रंगारी, तेजेंद्र गजभिये, यशोदा निमगडे, देवराव मोटघरे, घनश्याम मेश्राम, नत्थुजी रंगारी, शितल डोंगरे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने पंथीय बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे