
0
4
0
9
0
3
गुलाबी साडी आणि..
गुलाबी साडी आणि
नाकात नथ मोत्याची
मराठ मोळी नार मी
चाल माझी तोऱ्याची
गुलाबी गुलाबी शोभे
माझ्या लाली ओठावरी
माळला मी गजरा केसात
गंध दरवळे आसमंतावरी
कानामध्ये लावले झुमके
पायात वाजे माझ्या पैंजण
तुझ्यासाठी केला साज श्रृंगार
भाळी तुझ्या नावाचं कोंदण
रायाने घेतली पैठणी त्यावर
उठून दिसे काठ भरजरी
गुलाबी साडी आणि हिरवी चोळी
रेखीलेली नक्षी मोराची पदरावरी
गुलाबी साडी आणि त्यात
प्रेमाचे तुझ्या गहिरे उमटले रंग
बघ मला आज डोळे भरून
राया दिसते मी कशी सांग
प्रतिमा नंदेश्वर
जिल्हा चंद्रपूर
0
4
0
9
0
3





