सिर्सीत कॅनरा बँकतर्फे झीरो बॅलन्स खाते विशेष कॅम्पचे आयोजन
अखिल राजू रोडे, प्रतिनिधी
सिर्सीत कॅनरा बँकतर्फे झीरो बॅलन्स खाते विशेष कॅम्पचे आयोजन
सिर्सीच्या नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद
कॅनरा बँक गावात स्थापन करायची गावकऱ्यांची मागणी
अखिल राजू रोडे, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
उमरेड/सिर्सी: (दि ७ नोव्हे.२०२५) सिर्सी गावात युको बँक एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. गावातील आणि आजूबाजूच्या गावातील बहुतांश शेतकरी , व्यापारी , विद्यार्थी ई. खातेधाराकांचे खाते युको बँक सिर्सी येथे आहे. युको बँकेकडून खातेधारकांना बहुतांश अडचणींना सामोरे जावं लागते. यामुळे गावात दुसरी एक बँक स्थापन व्हावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.
मनोज दांदडे भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांनी कॅनरा बँकेच्या व्यस्थापकाशी संपर्क साधत कॅनरा बँकेने गावकऱ्यांचा प्रतिसाद पाहण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२५ रोज शुक्रवारला सिर्सी सांस्कृतिक भवन येथे कॅनरा बँक कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यात बँकेतर्फे झीरो बैलेंस खाते उघडून देण्यात आले. सोबत शेतीविषयक कर्ज , गृहकर्ज , गोल्ड लोन इत्यादी कर्ज सेवा आणि बँकिंग सुविधा याबाबत माहिती दिली.
कॅनरा बँकच्या वतीने सुमित गंगात्रे, प्रदीप बोधेले, राजू गडपायले यांनी नागरीकांचे खाते उघडून दिले. आशिष वाडीघरे यांनी नागरीकांना फॉर्म भरण्यासाठी मदत केली.
ग्रामपंचायत सिर्सीचे उपसरपंच अतुल नारनवरे , सुधाकर चुटे, दिलीप डडमल, दिलीप डाखोळे, प्रफुल फरकाडे , कमलेश दांदडे, अजय मुळे, चेतन कामडी , रोशन मेहरकुरे, अमोल डेकाटे, सतीश अड्डक, शुभम रोडे, राकेश फटिंग, विजय वरघने, गणेश पडोळे, पल्लवी कामडी, यशोदा चुटे, इत्यादी नागरीकांनी कॅम्पला भेट देत खाते उघडले. कॅनरा बँकचे खाते उघडायला नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लवकरात लवकर सिर्सी येथे कॅनरा बँक स्थापन करावी अशी नागरिकांनी मागणी केली.





