“सामाजिक एकता व देशाची अखंडता टिकविणे युवकांची जबाबदारी”; नरेश शेळके
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे युवा स्वतंत्र ज्योत रॅलीचे आयोजन
“सामाजिक एकता व देशाची अखंडता टिकविणे युवकांची जबाबदारी”; नरेश शेळके
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे युवा स्वतंत्र ज्योत रॅलीचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा: इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात युवकांनी स्वतंत्र संक्रमणात उड्या घेतल्या,स्वातंत्र्य योध्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, छातीवर गोळ्या घेतल्या, फासावर गेले हुतात्मे पकडले तेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आज आपण स्वातंत्र्याचे फळे चाखत असताना स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची जाण ठेवून आपल्या देशाला घातक असलेल्या प्रवृत्तीपासून सज्जक राहावं. आजच्या युवकाचे कार्य देश हिताचे असावे, सामाजिक एकता व अखंडता टिकविणे ही युवकांची जबाबदारी आहे असे मत नरेश शेळके सचिव, यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र बुलढाणा यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुलढाण्यामध्ये आयोजित युवा स्वतंत्र ज्योत रॅली मध्ये केले.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्र ज्योत रॅली काढल्या जाते. आजच्या युवकांना स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या जागांची जाण व्हावी या हेतूने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून काढल्या जाते. बुलढाणा शहरांमध्ये देखील यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र बुलढाणा व शिवराज शिक्षण संस्था अन्त्रि तेली यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सोळा वर्षापासून युवा स्वतंत्र ज्योत रॅली काढल्या जाते.
यावर्षी देखील 14 ऑगस्ट वार बुधवार रोजी रात्री आठ वाजता जस्तंभ चौक बुलढाणा येथून सदर रॅली काढण्यात आली .रॅलीची सुरुवात बुलढाणा शहराचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली. रॅली ही शहराच्या मुख्य मार्गाने देशभक्तीपर नारे देत हुतात्मा गोरे स्मारक येथे आली. हुतात्मा गोरे स्मारकावरती पुष्पचक्र समर्पित करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा. अंजली गाडे यांनी केले, तर यावेळी ज्येष्ठ समाजसेविका शाहीना ताई पठाण, प्राचार्य अण्णासाहेब म्हळणे ,पीएम जाधव, डॉ. गायत्री सावजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन प्रा.दीपक आमले यांनी केले. यावेळी डी डी वायाळ माजी गटशिक्षणाधिकारी, डॉ.विजयाताई काकडे, माजी सभापती लक्ष्मी शेळके, ह भ प शंकर महाराज ,अनिल बावस्कर, बाळासाहेब एसकर ,सत्तर कुरेशी ,रामेश्वर मानमोडे, गोपालराव देशमुख, प्रकाश काळवाघे, अनिल कोळसे, प्रा. सचिन खरे नाझीमाताई खान, गजानन भीमशंकर, मनोज चंदन, सुरेंद्र जवरे ,संतोष पवार, विनोद गवई ,संतोष बोर्डे ,सुजित देशमुख, रवींद्र शेळके ,सतीश शेळके, शारदा उबरहंडे, शिवराज शेळके, यांच्यासह मोठ्या संख्येने युवक व नागरिक उपस्थित होते.



