बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासमध्ये चित्रकला परीक्षा संपन्न
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासमध्ये चित्रकला परीक्षा संपन्न
अलिबाग: आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये दि. २५ सप्टेंबर २०२४ ते दि. २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाची एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेला बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज – आवास, श्री. स.म.वडके विद्यालय -चोंढी – किहीम, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाची इंग्रजी माध्यमाची शाळा – चोंढी – किहीम, किंग डेव्हिड इंग्लिश मिडिअम स्कूल – चोंढी, सारळ माध्यमिक विद्यालय – सारळ, सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल – अलिबाग या शाळांमधील सर्व मिळून एलिमेंटरी परीक्षेसाठी ३२१ विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेसाठी ३६६ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेसाठी आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, सर्व पदाधिकारी व सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या परीक्षेसाठी लागणारी सर्व व्यवस्था व नियोजन बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर व सहाय्यक शिक्षक यतिश शिंदे सर यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या परीक्षेसाठी मोलाचे सहकार्य केले. परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यात यतिश शिंदे सर यांचे सर्वात मोठे योगदान आहे.





