शिंपल्यातील मोती
विचार करून बोलावं
बोलून विचार करू नये
बोललेला शब्द वापस
घेता येत नाही
दुरावलेली नाती पुन्हा
जवळ येणार नाहीत
दुखावलेल्या मनाला
समजवू शकाल का ?
आपल्या बोलण्याने कोणी
दुखावत तर नाही ना
याचा विचार जरूर करा
आयुष्यातून गेलेली वेळ
व माणसं परत
कधीच येत नाहीत
सगळण्यांना आपलस करण्याच्या
प्रयत्न करत राहा
आहात तोपर्यंत एकमेकांना
सावरून,आवरून आयुष्य जगा
गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीत
तुम्ही रोज रडाल तरी
काहीही अर्थ नाही
एकमेकांना वेळ देऊन
आपले माणसे जोडून
ठेवण्याच्या पर्यंत करा
माझं माझं म्हणतो आपण
आपल्या हातातून कधी
निसटून जाईल
कळणार पण नाही
आयुष्य सुंदर आहे फक्त
आपली माणसं सोबत हवीत
मग तुमच्या इतका श्रीमंत
कोणी नसेल
श्रीमंती तर जपतोच आपण
त्याचप्रमाणे माणुसकीही जपा
जीवन जगा छान
आहे ते खूप मौल्यवान
चिखलातील कमळ
शिंपल्यातील मोती
बनून तर बघूया…….
कल्पना सुरवसे
ता उमरगा जिल्हा धाराशिव
==========





