0
4
0
9
0
3
माझं माझं करू नका!
जन्मा येणे मृत्यू होणे,
नाही कुणाच्या हातात…
कधी कुणाच्या संगती,
धन वैभव जातात…१
आल्या जन्माचे सार्थक,
व्हावे निस्वार्थ प्रेमार्थ…
प्रेमे जगा प्रेमे वागा,
घाला आयुष्य सेवार्थ…२
सृष्टी असे दानदाता,
देई भरून ओंजळी…
उगा दावू नको तोरा,
धन संपत्ती आंधळी…३
काय कमावलं श्रमे,
काय निर्मित केलंय…
सारा सारा भ्रम असे,
फक्त सांत्वना भलंय…४
वेड्या मानवा काय तू,
काय तुझी रे औकात…
शून्य असे कर्म तुझे,
फक्त सृष्टीची सौगात…५
माझं माझं करू नका
माझं काहीच हो नाही…
‘सुधाकरा’ मानवा तू,
जगा वेगळा तू पाही…६
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
0
4
0
9
0
3





