Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

विशेष जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा; वि.सा.कृ.स. मार्फत राज्यपाल यांना निवेदन

रजत डेकाटे, नागपूर

0 4 8 2 8 6

विशेष जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा; वि.सा.कृ.स. मार्फत राज्यपाल यांना निवेदन

उमरेड / मालेवाडा प्रतिनिधी

रजत डेकाटे, नागपूर

नागपूर: उमरेड तालुक्यातील विविध सामाजिक कृती समिती संघटना उमरेड याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या तर्फे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व क्षेत्रातील नागरिकांची आणि सामाजिक संघटनांची मुस्कटदाबी करीत त्यांना अर्बन नक्षलवादी घोषित करण्याचा डाव सरकार आखत आहेत.

सरकारला जाब विचारणाऱ्या लोकांना तुरुंगात डांबण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 या गोंडस नावाचा कायदा राज्य सरकार आणू पाहत आहे.- कोणत्याही जन आंदोलनाला या प्रस्तावित कायद्यानुसार बेकायदेशीर ठरवून संबंधितांना जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज दडपण्याचा राज्य सरकारचा हेतू स्पष्ट होतो आहे.

विशेष जनसुरक्षा कायदा या पद्धतीचा कायदा महाराष्ट्रात आणून संविधानातील स्वातंत्र्याचे मूल्य नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ नये यासाठी या कायद्याला मान्यता मिळू नये अशी राज्यपालांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे

दि. ८ ऑगस्ट गुरुवार ला यासंबंधी राज्यपालांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी इंजि.सपना मेश्राम, राजेंद्र मेश्राम,पारस शंभरकर, चंद्रशेखर बावनकुळे, राजेश वानखेडे, सुखराम सोनटक्के, विनोद मेश्राम,जबुनिसा शेख,राजु नाईक, सुरेश झुरमुरे, संदिप गुंफलवार, प्रशांत सपाटे, पचभई, होलवेज ढोबळे, डॉ.सी.जी. पाटील, सुधीर रामटेके,रंजिता मेश्राम, अस्मिता नगरारे, सुनिता थुटान आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे