Breaking
आरोग्य व शिक्षणकविताकृषीवार्ताकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईसंपादकीयसाहित्यगंध

परतीचा किंवा मुक्कामाचा पाऊस, हाल-बेहाल करूनच परततो; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 8 4

परतीचा किंवा मुक्कामाचा पाऊस, हाल-बेहाल करूनच परततो; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

भारतात विज्ञान इतके प्रगत झाले आहे, की उपग्रहांच्या माध्यमातून मान्सून आणि हवामानाचा अंदाज अगदी अचूक लावला जातो. जून महिन्याच्या आसपास विविध प्रसिद्धी माध्यमातून “यंदा मान्सूनचे वेळेत आगमन” अशी बातमी आली की बळीराजा सुखावतो. मात्र याच अंदाजाला लहरीबाज निसर्ग कधी चकवा देत धुमाकूळ घालतो व तोंडचे पाणी पळवतो. अतिवृष्टी आणि अनावृष्टीचे दुष्परिणाम कृषीक्षेत्रासह इतर क्षेत्रांनाही भोगावे लागतातच. ग्रामीण भागात वेळेवर बरसणारा मान्सून वाजवीपेक्षा जास्त झाला तरीही शेतजमिनी ते पाणी जिरवून घेतात.

मात्र शहरीभागातील डांबरीकरण, काँक्रिटीकरण, अवास्तव केरकचरा, यामुळे अचानक वाढलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. परिणामी रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प होते. तळमजले पाण्याखाली जातात. जनजीवन विस्कळीत होते, सर्वसामान्य लोकांना प्रचंड झळ बसते. नोकरशहांची तारांबळ उडते. चारचाकी दुचाकी वाहून गेलेली उदाहरणेही अनेक आहेत. काल शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी समूह प्रमुख आ. राहुल दादांनी दिलेले चित्र या सर्व परिस्थितीचे बोलके प्रतिनिधीत्व करते. कधी कधी परतीचा पाऊस सुद्धा मुक्कामाच्या थाटात बरसतो. शहरी भागातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येते. परिणामी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो.

*पर्जन्य अस्त्र*
*जन जीवन त्रस्त*
*संकटग्रस्त*

आज समस्त हायकूकारांनी दिलेल्या चित्राला न्याय देणार्‍या रचनांची शानदार पेशकश केली. तरीही वर्णनात्मकता टाळून कलाटणी देऊन परिणामकारकता आणण्याचा प्रयत्न केला जावा. एकाक्षरी प्रयोग टाळावेत. आणि विचार करायला प्रवृत्त करणारा क्षण शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करावा.. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादा आणि समूह प्रशासनाचा मी आभारी आहे.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक, सहप्रशासक, कवी, लेखक
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे