डाॅ.मधुसूदन घाणेकर ‘आंतरराष्ट्रीय मधमाशी संवर्धन योगी पुरस्काराने सन्मानित
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
डाॅ.मधुसूदन घाणेकर ‘आंतरराष्ट्रीय मधमाशी संवर्धन योगी पुरस्काराने सन्मानित
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे : (दि 6 डिसेंबर): वर्ल्ड क्वीन बीज संस्थेतर्फे संस्थेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी नुकताच आंतरराष्ट्रीय विचारवंत सामाजिक कार्यकर्ते आणि विश्वजोडो अभियानाचे प्रवर्तक सबकुछ सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय मधमाशी संवर्धन योगी पुरस्कार प्रदान केला.
या प्रसंगी हॅन्डरायटिंग ॲनॅलिसिस रिसर्च फाऊंडेशन आणि मधुरंग संस्थेच्या सचिव सौ.मेघना मधुसूदन घाणेकर उपस्थित होत्या. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भारतासह 20 देशात प्राणीमात्रांवर प्रेम करा, मानवधर्म श्रेष्ठ धर्म, निसर्गावर प्रेम करा सा-या विश्वावर प्रेम करा आदि उच्च आदर्शवादाचा प्रसार केला आहे.
‘मधमाशी वाचवा = विश्व वाचवा ‘ या अंतिम ध्येयासाठी वर्ल्ड क्वीन बीज संस्था स्थापन करण्यात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी मोलाचे सहकार्य दिले. वर्ल्ड क्वीन बीज संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषविले तसेच सेल्फी विथ हनीबीज आणि रांगोळीच्या माध्यमातून मधमाशी वाचवा :विश्व वाचवा या सारख्या मौलिक उपक्रमांसाठीही मोलाचे योगदान दिल्याबद्दल सदर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान प्रदान केला असल्याचे वर्ल्ड क्वीन बीज मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी सांगितले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी साहित्य, शिक्षण, सामाजिक, दिव्यांग आणि वंचित विकास , महिला सबलीकरण , सांस्कृतिक, बाल कल्याण, विश्वजोडो अभियान, सबका विकास: राष्ट्रविकास अभियान,संपादन अध्यात्म, ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण, रेकी -संमोहन , जीवनात शाश्वत आनंद मिळवण्यासाठी ब्रम्हध्यान अशा विविध पातळीवर ‘कार्यमग्नता हेचि जीवन ‘ या जीवन प्रणालीतून आपले आयुष्य व्यतीत करीत असलेले योगी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद असल्याचे मधुकर्णिका यांनी सांगितले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना प्राप्त झालेल्या सन्मानाबद्दल युवा विश्व संस्थेच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई, महिला सन्मानच्या सचिव दीपाराणी गोसावी, माध्यमतज्ञ वसुधा नाईक,आत्मनिर्भर भारत संस्थेच्या निमंत्रक भारती महाडिक, बीजेपीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास तेलंग आणि सुभाष भागवत यांनी डाॅ.घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.





