कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
पावसाळा; दीपककुमार सरदार

0
4
0
9
0
3
पावसाळा
आला पावसाळा । कोसळती धारा
सोबतीला वारा । घेऊनिया ॥१
टपोऱ्या थेंबाने । अवनी भिजली
तृणे अकुंरली । चोहीकडे ॥२
गांव शेजारची । नदी खळाळली
मुले आनंदली । पोहायला ॥३
कपडयांचा ढीग । टोपल्यात डोई
निघाली ती आई । नदीवर ॥४
गेलाय फुलून । नदीचा किनारा
परिसर सारा । सुगंधाने ॥५
हातपंप सारे । भरूनिया गेले
गाली हसू आले । बायकांच्या ॥६
हिरवा निसर्ग । हवासा तो वाटे
हर्ष मनी दाटे । सगळ्यांच्या ॥७
दीपककुमार सरदार
ता.लोणार जि. बुलढाणा
==========
0
4
0
9
0
3





