0
4
0
9
0
3
मुंगीचं घर
पावसाळा लागता,
मुंग्या कामाला
घर बनवायला
वारूळीची सूंदरता।
जसा राजमहल
पहा मुंगीचा बंगला
तीथे असते शिस्त,
राणीची भीस्त।।१।।
एकीचे बळ,
मुंगीला कळे
घरासाठी श्रमे,
एकपणाणे ।
ईवलासा जीव,
वाहते मुखात
पाणी मातीचं,
घर बांधते सुगीत।।२।।
एकत्र कुटूंब
बहारदार
मुंगीचं घर
शानदार।
वारूळाचं घर
थंडगार
मुंगीचं घर
गारेगार।।३।।
शिस्तप्रीय मुंगी
संस्कार अंगी
कष्टाळू जीव
ईमानीनं जीवे।
ध्येय वेडया
कला कौशल्यानं
भरलेलं मुंगीचं
राजघर नक्षीदार।।४।।
मुंगीच्या घरी
बघावा,बाळा
कष्टाळु,एकता,
शिस्तीचा मळा।
मुंग्यांच्या घराचा
लागला लळा
प्रेम जिव्हाळा
माणसाला कळावा।।५।।
जीव लहान शिकवण महान बाळा…….
गणेश नरोत्तम पाटील
शहादा,जि.नंदूरबार
0
4
0
9
0
3





