0
4
8
2
8
6
हरवलेला सूर
भुर्रकन उडाले ते दिवस
उरल्या फक्त आठवणी
विरले हास्य ओठीचे
आता डोळ्यात पाणी
मंत्रमुग्ध करायची कधी
ह्दयातून येणारी गाणी
सूरच हरवलाय आता
नि:शब्द झालीय वाणी
व्यथा सांगायची कुणाला?
काळजातलेच दगाबाज
दु:खाचे घोट पित पित
वेदनेत जळतोय आज
उघड्या डोळ्यासमोरच
जिंदगी जळून खाक
सावडत बसलोय आता
आपल्याच जिंदगीची राख
राखेतूनच जन्मेल फिनीक्स
अशी झेप घेईल वादळी
झममगेल आयुष्य पुन्हा
दूर कायमची काजळी
अरविंद उरकुडे, गडचिरोली
==========
0
4
8
2
8
6



