0
4
0
8
9
0
थेंब थेंब
थेंब थेंब पाण्याचा
वाचवू या गड्यांनो
नदी नाले तलावात
साठवू या गड्यांनो
पाणी आहे मोलाचे
महत्व जाणा जलाचे
वाहून जाईल पाणी
हाल होईल जीवाचे
पिण्यासाठी पाणीच
हवेच हो आपल्याला
स्वच्छतेस अंघोळीस
वापरता न पाण्याला
धुणी-भांडीला पाणी
वापरा हो जरा जपून
गावखेड्यामध्ये पाणी
लोकं आणतात खपून
नळाने वाहत येते पाणी
उतू नका हो मातू नका
थेंब थेंब पाणी वाचवून
सजग नागरिक हो बना
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
=======
0
4
0
8
9
0





