0
4
0
9
0
3
कुटुंब कबिला
विचारांची देवाण – घेवाण ,
एक दुसर्यांचा सम्मान ,
हीच कुटुंब कबिल्याची शान .
मनसोक्त आनंदाचा ठेवा ,
आहे आपला कुटुंब कबिला ,
पण या आनंदाला ,
आपला सजीव मुकला .
आम्ही दोघे आणि
आमची मुलं दोघे ,
च्या हव्यासा पोटी
चारचौघे पाहात उभे.
विचारानेच या
दिली कलाटणी,
कुटुंब कबिल्याची
झाली विभागणी.
आजी आजोबा झाले दूर
आम्ही जातो भुरभुर
विभक्त कुटुंबाचे दुष्परिणाम
नाही गमती ,नाही सात्विक खानपान.
माधुरी हेमराज लांजेवार
ता.नागपूर, जि.नागपूर
============
0
4
0
9
0
3





