Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

देवाचे आभार

कु. हर्षिता पाटील (बाललेखिका)

0 4 8 2 8 4

देवाचे आभार

एक मीरा नावाची मुलगी होती. ती चौथ्या वर्गात शिकत होती. मीराला फिरायला खूप आवाडयचे. तसे घरचेही तीला फिरायसाठी मनाई करत नव्हते. एके दिवशी म्हणजे, शनिवारी सकाळची शाळा होती. शाळा सुटल्यानंतर मीरा घाईघाइने घरी परतली. पण, आई बाबा कुठेच दिसत नव्हते. मीराने पाहिले तर दाराला कुलूप होते. तिला प्रश्न पडला? की आई बाबा असे न सांगता कुठे गेले असावे?

तीने कुलूप तोडण्याचे खूप प्रयत्न केले. दगड आणून कुलुपावर घाव घातले पण काही अर्थ झाला नाही. मग कु-हाड दिसली खरी पण जड असल्याने ती उचलता आली नाही. रडून रडून भूकही लागली होती. मीराला काही सुचेना. तशीच थेट ती शेताच्या दिशेने जायला निघाली. तेवढ्यात आकाशात पक्षी आपल्या पिलांसह उडतांना दिसले. ते पाहून आनंद झाला. तिला फिरायची आवड असल्याने ती पक्ष्यांच्या मागोवा घेत घेत नव्याच वाटेने निघून गेली. खरे म्हणजे मीरा रस्ता विसरली होती. आता सायंकाळ होणार होती.

तेवढ्यात तिला एक मंदिर दिसले. ती रडू लागली. मंदिरात गेली असता तिथे एक माठ दिसला त्यातील थोडे पाणी पिले. जरा शांत झाली आणि प्रार्थना करू लागली, की “माझे आई बाबा कुठे गेले असतील तर त्यांना इथे पाठव”, मला असे न सांगता घरून निघायला नको होते. ‘मीच चुकीची आहे देवा’. असे म्हणून प्रार्थना करू लागली. तेवढ्यात मीराचे आई बाबा शोधत शोधत मंदिरात पोहचले. मीराला पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. मीराने देवाचा धावा केला म्हणून आई बाबा परत आले. असे समजून देवाचे आभार मानले व आई बाबांसोबत मीरा आनंदाने घरी गेली

कु. हर्षिता पाटील (बाललेखिका)
वर्ग ४ था देवकीबाई बंग मराठी प्रा. शा.हिंगणा जि. नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे