
0
3
4
5
6
1
फांद्याच फांद्या
वडाच्या झाडाला फांद्याच फांद्या
फांद्यांना लागली लाललाल फळे
रसरशीत ताजी ताजी
खायला आली पोपटाची बाळे
पेरूच्या झाडाला फांद्याच फांद्या
फांद्यांना लागले गोड गोड पेरू
रसरशीत ताजे ताजे
खायला आले छोटेसे पाखरू
आंब्याच्या झाडाला फांद्याच फांद्या
फांद्यांना लागले गोड पाड
रसरशीत ताजे ताजे
खारूताईंनी टाकली त्यावर धाड
डाळिंबाच्या झाडाला फांद्याच फांद्या
फांद्यांना लागले लालसर डाळिंब
ताजे ताजे रसरशीत
खायला आला हत्ती अगडबंब
शेवग्याच्या झाडाला फांद्याच फांद्या
फांद्यांना लागल्या लांबलांब शेंगा
ताज्या ताज्या मोठ्या मोठ्या
खायला माकडे करती दंगा
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
3
4
5
6
1