सिर्सी पोलिसांनी गौ तस्करांना केले जेरबंद
गुरांची चोरटी वाहतूक ट्रक जप्त, २२ जनावरांची सुटका : ४ मृत
बेला पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी :- अखिल रोडे
सीर्सी : सिर्सी पोलिस चौकी यांना मिळालेल्या विश्वसनीय गुप्त माहीत्याच्या आधारे सिर्सी पोलिसांच्या पथकाने उमरेड – हिंगनघाट मार्गावर २५ जानेवारी रोज शनिवार मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याच्याकडून ट्रक व २२ जनावरे व ४ मृत जनावरे जप्त केली. त्या जनावरांना कॉडवाड्यात ठेवण्यात आले आहे.
सीर्सी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस पथकाने नाकाबंदी करत गावकऱ्यांच्या मदतीने एमएच- 34 /बी.जी-6307 क्रमांकाच्या ट्रक अडवून ट्रॅक ची पाहणी केली असता ट्रक मध्ये २२ जनावरे आणि ४ मृत जनावरे आढळून आले. ट्रक चालक ची कसून चौकशी केली असता.
ही जनावरे गडचिरोली वरून हैद्राबाद येथे घेऊन जात असल्याचे कबूल केले.
अमरावतीच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याचे दिसले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ट्रकचालक शाहरुख रेहमत पठाण (३०) व क्लिनर शेख इम्रान शेख ख्वाजा ( ३२) (रा.ता. मृतिजपुर, जिल्हा अकोला , महाराष्ट्र) याच्या विरोधात गुन्हा नोंदविला. त्याच्याकडून ट्रक व बैल जप्त केले असून, त्या बैलांना सीर्सी गावातील कॉंडवाड्यात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई नागपूर पोलिस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दिपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात बेला पोलिस स्टेशन ठाणेदार श्री चेतनसिंह चौहान यांच्या सहकार्याने सिर्सी पोलिस चौकी इंचार्ज श्री निलेश बिजवाड व पोलिस शिपाई अमोल कोटेवार यांच्या पथकाने केली.
या कार्यवाही बद्धल दबंग पोलिस अशी ओडक असलेले सीर्सी पोलिस चौकी इन्चार्ज निलेश बिजवाड यांचे सर्वत्र अभिंनदन होत आहे.





