0
4
8
2
8
6
पहिलं प्रेम
पहिलं प्रेम आईच्या उदरात
जन्म घेता मायेच्या पदरात
श्वास घेतला पहिला
टाहो फोडला
डोळे उघडले जेव्हा
आईला पाहिल तेव्हा
डोळे मिटून आनंदून गेलो
आईच्या छातीवर विसावलो
पाळणा केला हाताचा
घास भरवला मऊ भाताचा
जीवन सारे राही पाल्या भोवती
त्याच्यासाठी ती किती दुःख सहाती
मुले मोठी होतात
पाखरा प्रमाणे उडून जातात
तरी आई वाट पाही पिल्लांची
आज काय खल्लास म्हणून विचारायची
किती गोड आहेस तू आई
तुझ्यावरचे प्रेम कमी होणार नाही
तुझ्यामुळेच जग ग पहिलं
तुझ्या सोबत जगायचं खूप काही राहील
सुरेखा चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
0
4
8
2
8
6



