0
4
8
2
8
4
वैरी की कैवारी
किती सांगावे कुठे कुणा
कशी वाढत चालली दरी
गोड बोलून काढती उट्टा
समजेना वैरी की कैवारी
कित्येकदा फसले तरी
अजूनही आस वेडी मनी
होईल सारे होतील एक
कधीतरी सांगावे जनी
विश्वास फसवा वाटे मज
दुधारी तलवार पाजळली
ओठी एक अन पोटी एक
जिव्हा अशी कशी वळवळली
करा किती करणार घात
करेन मीही साऱ्यावर मात
खाचखळगे सवयीचे आता
चालेन त्यावर जणू फुलवात
सविता धमगाये
ता. जि.नागपूर
0
4
8
2
8
4



