Breaking
अलिबागकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे महिलादिन साजरा

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे महिलादिन साजरा

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली या संस्थेतर्फे आंतर राष्ट्रीय महिला दिन संस्थेच्या वाघोली येथील कार्यालयात ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. प्रयास हास्पिटलच्या संचालिका डा. सौ. रेखा म्हात्रे
(M. B. B.S.) प्रमुख वक्त्या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष दामोदर ठाकूर होते.

प्रारंभी संस्थेचे सल्लागार बळवं त वालेकर यांनी प्रमुख अतिथी डा डाॕ. रेखा म्हात्रे यांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले डाॕक्टर सौ. म्हात्रे यांनी आपल्या भाषणात महिलादिनाचे महत्त्व विशद करताना कुटुंबात महिलेचे स्थान किती महत्त्वाचे आहे , हे सांगितले . स्त्रिया पहाटे ५ पासून रात्री ११ वाजेपर्यंत विविध कामांमध्ये दँग असतात . पण त्यांच्या कामाचे मूल्य कोणीही करीत नाही.सतत काम पण विश्रांती नाही . यामुळे त्यांना अनेक रोग जडतात. मधुमेह , ह्रुद्रोग , कॕन्सर इ. रोगांचा त्यात समावेश असतो. पण बहुतेक महिला रोग अंगावर काढतात . म्हणून त्या रोगाच्या बळी ठरतात, असे सांगून त्या म्हणाल्या प्रक्रुतीची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून वेळौवेळी डाॕक्टरचा घ्या व आयुर्मान वाढवा. आनंदी राहा. असाही सल्ला त्यांनी दिला.

यावेळी सल्लागार बळवंत वालेकर यांचेही भाषण झाले. शासनाने महिलांना कसे झुकते माप दिले आहे , ते त्यांनी सोदाहरण विशद केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर , सेक्रेटरी दत्तात्रेय नांदेकर , सह सेक्रेटरी अच्युत पाटील खजिनदार जनार्दन पाटील , सह खजिनदार मधुकर पाटील एकनाथ राघो म्हात्रे , श्रीमती नंदा महादेव नांदेकर , श्रीमती लिलाबाई पाटील ,
श्रीमती पुष्पलता पाटील , सौ.पुष्पा दामोदर ठाकूर , सौ. यशोदा शांकर पाटील , सौ. वासंती अरूण पाटील , सौ. शैला शरद ठाकूर , सौ. वासंती प्रभाकर वर्तकचृ , सौ. हर्षदा रोहन वर्तक , सौ. शकुःतला बाळाराम पाटील , सौ. सुशिला रामचंद्र पाटील , प्रकाश पाटील, (वाघोली) प्रदीप पाटील (भायमळा) , अनःत वर्तक इ. १०० महिला व पुरुष सदस्य उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे