अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी पुरस्कार 2025
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
पुणे – 31 मे 2025 : “प्रत्येक महिलेच्या अंतःकरणात अहिल्या आहे.प्रत्येकीने आत्मनिर्भर व्हावे, नव्या युगाची तडफदार अहिल्या साकार होईल. अबला नव्हती अहिल्या सबला होती अहिल्या.महिलांचे पूर्णतः सबलीकरण व्हावे म्हणजे राष्ट्र बलशाली होईल.”असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विश्वजोडो अभियानाचे प्रवर्तक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी समिती आणि वर्ल्ड लिटरेचर या संस्थांतर्फे संयुक्तरित्या 9 कर्तबगार महिलांना अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी पुरस्कार तसेच मी सबला काव्यस्पर्धेतील विजेत्यांना आंतरराष्ट्रीय काव्यगौरव पुरस्कार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. डाॅ.घाणेकर या सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
” होळकर काळात सतीची चाल होती मात्र पती निधनानंतर सासरे मल्हारराव होळकर यांनी सुनेला (अहिल्याबाई) सती जाऊ दिले नाही.तिने समाजकार्यात लक्ष घालावे असे सांगून मल्हाररावांनी अहिल्याबाईला घडवले.आणि दुर्दैवाने या कलियुगातील सासरा हुंडा घेण्यासाठी सुनेचा बळी घेतो.”असेही डाॅ.घाणेकर पुढे म्हणाले. ज्येष्ठ पुरस्कारार्थी मंदाताई नाईक यांच्या शुभहस्ते पुरस्कार सोहळ्याचेउदघाटन करण्यात आले. मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रिया दामले, वसुधा नाईक, दीपाराणी गोसावी, भारती महाडिक, भावना गुप्ता , मधुकर्णिका सासवडे , अनघा सावनूर,सोनिया गोळे यांनी अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी पुरस्कारार्थींनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनप्रणालीवर प्रकाशझोत टाकला.
मी सबला काव्यस्पर्धेतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डाॅ.अपर्णा राईरीकर आणि अजया मुळीक यांनीही मनोगत व्यक्त केले.या सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर लिखित ‘ पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकर ‘ हे पुस्तक तसेच डाॅ.घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाच्या 770 व्याअंकाचे प्रकाशन पुरस्कार विजेत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.





