
0
4
0
9
0
3
तिसरी घंटा
आयुष्याच्या उत्तरार्धात या
तिसरी घंटा निनादली
वळणावर या वार्धक्याच्या
पाऊले अवचित स्थिरावली ||१||
रंगमंच आयुष्याचा आजवर
अनेक भूमिकेत साकारला
आता तिसरी घंटा झाली
रंगमंच जराजरासा विसावला ||२||
तिसरी घंटा अखेरची
नाटक आता संपणार
देह झाला कृतकृत्य
आणखी काय मागणार? ||३||
प्रवेश सफल झाले सारे
पहिल्या दोन अंकांचे
तिसर्या घंटेच्या अखेरीस
आता आभार रंगभूमीचे ||४||
बहरली आयुष्यवेल आज
समाधान पावली गात्रे
रंगमंचावर या आयुष्याच्या
खुबीने साकारली पात्रे ||५||
आता विसाव्याचे क्षण
करू पाहतो स्थिर मन
आयुष्याचे सार्थक झाले
होवो जन्माचे संकीर्तन ||६||
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
=========
0
4
0
9
0
3





