Breaking
अहमदनगरई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

जरी आयुष्य अल्पसे

डाॅ. नझीर शेख राहाता जि.अहिल्यानगर

0 4 0 9 0 3

जरी आयुष्य अल्पसे

जरी आयुष्य अल्पसे
तरीही त्यात कर्तृत्वाला वाव॥
वात्सल्य स्नेहाच्या जोरावर आपण
वसवू शकतो प्रेमाचे गाव ॥॥॥॥

फुलाचे आयुष्य क्षणभंगूर
तरीही देते जगाला परिमळ ॥
आपल्या विविध रंगांनी
घालीते जगास भुरळ ॥॥॥॥

फुलपाखरें किती अल्पजिवी
तरीही दुनियेस देते नेत्रसुख ॥
जाता जाताही जगाचे
हरते हरते पळभर दुःख ॥॥॥॥

तरूवेली देती फळेफुले
अन देती शीतल छाया ॥
वृक्षांप्रमाणेच करू शकतो आपण
थकल्या भागल्यांवर माया ॥॥॥॥

निसर्गातील सर्व गोष्टी नश्वर
तरीही तयांना खंत ना खेद ॥
जगाच्या उपयोगी पडताना
सांडत नाही उमेद ॥॥॥॥

डाॅ. नझीर शेख
राहाता जि.अहिल्यानगर
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे