0
4
8
2
4
2
ढगाआडचा चंद्र
ढगाआडच्या चंद्रा
का रूसलास तू?
का झालास फितूर?
का चाललास दूर?
लावून जीवाला हुरहूर
येना रे बाहेर
दर्शनासाठी मी आतूर…
मेघ हे फसवे
देतात कधीही दगा
आणि माझ्या काळजात तर
तुझी कायमचीच जागा
अजूनही आपल्या नात्याचा
अतूट रेशीम धागा
नको करू आता
उगाचच त्रागा…..
आठवांच्या पावसात
चिंब हो एकांतात
दिसेल तुला प्रतिबिंब
आपल्या नात्याचं हर थेंबात
पांगव ना रे ते
उदासीनतेचे काळे ढग
निरभ्र मनाने बघ
सर्वांग सुंदर आपलं जग
अरविंद उरकुडे, गडचिरोली
0
4
8
2
4
2



