0
4
0
9
0
3
आयुष्याचं गणित
आयुष्याचं गणित सोडवताना
बऱ्याचदा होते दमछाक
नियमानुसार वागूनही सारखा
पाळावा लागतो नसता धाक.
स्वार्थाची वजाबाकी करून
उदारमनाच्या बेरजेने जोडली नाती
कामापुरता मामा अनुभव
बाकी पदरी शून्य हाती.
प्राक्तनाचा खेळ हा सारा
आयुष्याचं गणित क्लिष्ट
मीही हार मानणार नाही
सोडवेन अचूक करून धारिष्ट्य.
आयुष्याचं गणित सोडवता
अवघड वाटते खूप
जीवनप्रवासात ओळखली
व्यक्तींची नाना रुपं.
बदलला जीवनाचा दृष्टीकोन
तर्कशुद्ध पद्धतीचे वापरले सुत्र
समाधानाचा केला गुणाकार
जमवले सारे निस्वार्थी मित्र.
जुळवूनही जुळत नाही
तिथून घेतली होऊन रजा
ज्यांच्यापासून होतो त्रास
त्यांना केलं आयुष्यातून वजा.
आपसुकच झाले सोपे
आयुष्याचं गणित आता
मानसिक शांती लाभून
विसरली खाल्लेल्या खस्ता.
सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
0
4
0
9
0
3





