वसुधा फाऊंडेशन’चा बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात साजरा
वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी
‘वसुधा फाऊंडेशन’चा बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात साजरा
वसुधा वैभव नाईक, प्रतिनिधी
पुणे: (दि १६) वसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित पहिली माध्यम परिषद, पुरस्कार वितरण, बक्षीस वितरण तसेच निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रम परिषद अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर उद्घाटक मा प्रमोद सूर्यवंशी दिग्दर्शक,प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे देशमुख काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, विशेष उपस्थिती आधुनिक बहिणाबाई मा.विमलताई माळी प्रसिद्ध कवयित्री तसेच वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होत्या.
यावेळी आईचे हळवे मन राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेत तब्बल विविध जिल्ह्यातून, गावातून 170 कविनी सहभाग घेतला होता. पण नियम आणि अटी नुसार प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ असे क्रमांक काढण्यात आले.
प्रथम
१) सौ कृपाली सावे
द्वितीय
१) विश्वनाथ गावडे
२) पल्लवी जोशी
तृतीय
१) सौ सुदत्ता साळवे
२) अर्चना माने
उत्तेजनार्थ
१) उर्मिला दुरगुडे
२) अनघा कुलकर्णी
३) कविता पाचंग्रे
४) दर्शन जोशी
५) गौरी राजगुरू
सर्व विजेत्यांना सन्मानपत्र, आकर्षक असे सन्मानचिन्ह देण्यात आले.तसेच
घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात आले. टाकाऊ पासून टिकाऊ ही थीम वापरली होती.त्यामुळे क्रमांक देखील तसेच काढण्यात आले. वसुधा फाऊंडेशन पुणे आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२५
*प्रथम क्रमांक*
१) मा.ललित पाटील (निगडी)
*द्वितीय क्रमांक*
२) सौ.सुनिता पिसके (उमरगा)
*तृतीय क्रमांक*
३) मा.नेहा रुद्रवार (नांदेड)
*उत्तेजनार्थ तीन क्रमांक*
१) सौ. शिवकांता नकाते चिमदे
२) सौ.प्रगती कोतवाल ( आष्टापूर )
३) सौ.अर्चना जेधे (पुणे)
मोठ्या थाटात हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वसुधा फाऊंडेशन अध्यक्षा सौ वसुधा नाईक, योगेश हरणे,गौरव पुंडे,मयुरी लायगुडे,श्रीराम घडे यांनी आयोजित केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी श्रीशैल सुतार यांनी केले. त्यांच्या शब्दसुमनाने रसिक खुश होते.





