बौध्द विहार हे चळवळीची आणि ज्ञानार्जनाची केंद्रे असावी
शहर प्रतिनिधी, नागपूर
बौध्द विहार हे चळवळीची आणि ज्ञानार्जनाची केंद्रे असावी
शहर प्रतिनिधी, नागपूर
नागपूर: आंबेडकराईट वुमेन हेल्प ग्रुप नागपूर तर्फे निर्मल काॅलोनी तील बुध्द विहारात नालंदा वाचनालयाचे उद्घाटन तसेच लोकार्पण आज दि. २६/१०/२०२४ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आद. अमर बागडे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा परिषद अधिकारी योगेंद्र बोरकर सर उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून उज्वला गणवीर, करूणा मून तसेच रंजना वासे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सुरूवातीला सामूहिक बुध्दवंदना झाली. त्यांनतर उपस्थित पाहूण्यांच्या हस्ते ‘नालंदा वाचनालयाचे’ उद्घाटन झाले. आपले विचार व्यक्त करतांना कार्यक्रम अध्यक्ष अमर बागडे सरांनी शासकीय नोकऱ्या मिळविण्यासाठी कोणते कोर्स करावेत आणि नोकऱ्या कशा मिळवाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. शनिवार, रविवार वेळ काढून वाचनालयात मूलांना करिअर मार्गदर्शन करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. विहारात वाचनालय सुरू झाल्याने गरजू विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फायदा होईल असेही ते म्हणाले.
प्रमुख वक्ता म्हणून विचार व्यक्त करतांना करूणा मून म्हणाल्या, डॉ बाबासाहेबांना काय अपेक्षित होते? जीवनवादी, शास्त्रीय, मानवतावादी, समाजहितकारी, शील आणि प्रज्ञा यांचा सुवर्णसंगम साधणारे शिक्षण अभिप्रेत होते. उज्वला गणवीर मॅडम आपले विचार व्यक्त करतांना म्हणाल्या, “आंबेडकराईट वुमन महिला हेल्प ग्रूप मागील चार वर्षापासून दरमहा अल्पराशी जमा करून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना, गरजूंना शक्य तेवढी आर्थिक मदत करीत आहे. या वर्षी बहिष्कृत हितकारिणी सभेचे शंभरावे वर्षे या निमित्ताने निर्मल काॅलोनी तील बुध्द विहारात मोफत ‘नालंदा वाचनालय’ सुरू करण्यात आले.
आॅल इंडिया समता सैनिक दलाच्या रंजनाताई वासे यांनी विहार हे ज्ञानार्जनाची केंद्रे झाली पाहिजे असे विचार व्यक्त केले. सेवानिवृत्त जिल्हा परिषद अधिकारी योगेंद्र बोरकर सरांनीही या वैचारिक कार्यक्रमाला मनःपूर्वक सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे समारोपीय भाष्य वर्षा चवरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सरिता सातारडे यांनी केले.
कार्यक्रमाला आंबेडकराईट वूमेन हेल्प ग्रूप च्या प्रतिभा सहारे, डॉ योगिता बनसोड, सविता धामगाये, सीमा थूल, नंदा देशभ्रतार, दीपाली दीप, वैशाली लोखंडे, वैशाखी रामटेके, गोडबोले, बबन वासे, इनकम टॅक्स आॅफिसर विजय शेलारे साहेब, अजय धारगावे, अशोक वासनिक, श्रीकांत फूले, पाटील, योगिता बोरकर, सीमा रामटेके, पंचशीला पाटील, अर्चना टेम्बुर्णे, करूणा मेश्राम, विजयाताई मंडपे, सुशीला चवरे, प्रतिक्षा चवरे सुभाष फुलझेले, बाळू बोरकर, खोब्रागडे, सुनंदा खांडेकर आणि विहारातील इतरही मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत मनोहर चवरे,नितीन चवरे, सुभाष फुलझेले तसेच बुध्द विहारातील उपासक, उपासिका यांनी घेतली.





