
0
4
0
8
1
6
जीवन प्रवास
बालपण तारुण्याला
स्वप्नांचा बहर येतो
मावळतीचा क्षण
अनुभवाचे रंग देतो
जगण्याचा सुख भोगण्याचा
क्षण हातचा विरघळून जातो
भौतिक सुखाच्या शोधात
माणूस आयुष्य हरवून जातो
बाह्य रूपाला भाळतो आण
अंतरी अविचाराने मलीन राहतो
पाप पुण्य माहीत नाही
कार्याची निसर्ग नोंद घेतो
आयुष्याचा प्रवास हा
स्मशानापर्यंतच जातो
नाशिवंत देह सर्वता
मातीतच मलीन होतो
सोबत काहीच येत नाही
मोहमाया जमवत राहातो
खाली हाताने येतो माणूस
खाली हातानेच जातो
प्रकाश पी. गोधने
ता. कंधार, जि.नांदेड
======
0
4
0
8
1
6





