
0
4
0
9
0
3
सरीवर सरी
सरीवर सरी पडतात भारी
आभाळात दिसते ढंगाची स्वारी..
चिमणी पाखरांची घरटी भिजतात..
मला प्रश्न मग ती कुठे झोपतात?..
सरीवर सरी नभातून येतात धाऊन..
मला खूप खूप मजा वाटते त्यांना पाहून….
सुरेख रंगीत इंद्रधनु दिसतो कधी ढगात..
वाटे रंगवणाऱ्याचे किती लांब असतील हात?..
धबधबे गातात खळखळून गाणी..
उंचावरून पडतं थंडगार पाणी..
फिरतो आम्हीं कागदाच्या होडीत..
थेंब टपोरे झेलतो ओंजळीत..
पाऊस पडताना कशाला ती छत्री..
चिंब चिंब भिजून करू निसर्गाशी मैत्री..
मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
=======
0
4
0
9
0
3





