कविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
हास्यमुद्रा; विष्णू संकपाळ

0
4
0
9
0
3
हास्यमुद्रा
चेहर्यावरून दुःखाचा
गळूनी पडू दे पापुद्रा
आणि तुझी मनप्रसन्न
खुलून उठू दे हास्यमुद्रा.. //
इथे मुळात तू आहेसच
भरातली शुभ्र पौर्णिमा
हे दुःख ग्रहण तात्पुरते
उजळावा मुख चंद्रमा.. //
तेच ते दुःख उगाळून
राहतेस सतत अस्वस्थ
कटू घोट गिळून घेऊन
थोडी होशील का स्वस्थ.. //
पानगळीच्या जखमेला
तू बसू नयेस कुरवाळत
वसंताची हास्य पालवी
ज्यात रहावे तू दरवळत.. //
तुझी तू स्मित हास्यमुद्रा
जरा आरशात घे बघून
मनातील नैराष्य मळभ
कायमचेच जाईल निघून… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
=========
0
4
0
9
0
3





