Breaking
ई-पेपरकवितागोंदियानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बाण नजरेतला

केवलचंद शहारे

0 4 8 2 9 3

बाण नजरेतला

तारूण्याने लव लुहान ती
आकाशात घेत असते भरारी
अशक्याला शक्य करण्यासाठीं
आपली ताकत लावते सारी

फुलपाखरा सारखे मुक्तपणे
आनंद घेत असते उडण्याचा
मनाच्या अंगणात राहून
सुगंध घेते सुगंधित फुलांचा

तेज नजरेने बघून दुसर्याला
घायाळ करते त्याच्या प्रेमाला
तरंगणारे त्याच्या सुंदर स्वप्नांना
अडकवतो तिचा बाण नजरेतला

तिच्या तारूंण्याची. खुमारी
थोडी काही वेगळीच असते
जिवापाड प्रेम करून ती
आयुष्याच्या शेवट पर्यंत जपते

काय खरं, काय खोटं
हे विश्वासातून ठरवत असते
पण बाण नजरेतला तिचा
आपल्या जिवनाला आकर्षित करते

नम्रतेने समोर येऊन ती
उचलत असते प्रकाशाचा कण
कितीही संकट आले तरी
वळवत नसते कुठेही मन
वळवत नसते कुठेही मन

केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे