Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*☄विषय : भिजकी वही☄*
*🍂शनिवार : २८/ जून /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*भिजकी वही*

सनातन्यांचा तो मारा
किती झेलला तुकाने
परि सोडली ना भक्ती
त्यांच्या सात्विक मनाने
वृक्षवल्लीला केले सोयरे
विठ्ठल धून मुखातून स्मरे
पुरोहितांना न देखवे डोळा
केला कर्मठांनी प्रहार राडा
बुडविली तुकाची गाथा
इंद्रायणीने भिजकी वही
मायेने धरली रे माथा..
तरून आली वर वर..
झुकविला कर्मठांचा माथा
ज्याच्या संगे पंढरीचा राजा
त्याची कशी भिजेल रे गाथा
जाण मानवा भक्तीचे मोल
आतातरी तुझे डोळे खोल
टाक अहंभाव,जप मानव्य
यातच तुझे कल्याणत्व..
भिजकी वही ला नित्य स्मर
क्षणभंगुर जीवन पावन कर

*सौ.तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

भिजली नाही गाथा ,नाही भिजकी वही।
क्रुपेनी विठ्ठलाच्या , सगळे आहे सही।।

अभंग जीवनात, व्हावेत सगळ्यांनी।
त्यालाच अम्रुताचे,लाभेल तुपदही।।

जीवनाचा कोणीही, कंटाळा करु नये।
सत्कर्म उजळेल ,आयुष्य दीशादाही।।

अंधाराची मलाही ,पर्वा मुळीच नाही।
देई स्वाती तारका,प्रकाश नभातही।

इंद्रायणी झालीय,माय माझी सविता ।
स्पंदन तारले जशी रुक्मिणी आग्रही।।

असेच चंद्रभागे ,पाणी निर्मळ वाहो।
पुंडलिकाचे दर्शन, मिळो पुरातही।।

संसार राहुलाचा, शब्दप्रभूंचा आहे।
प्रकाशित करतो ,जनमानसातही।।

भेदभाव सोडूनी, जमते मंदीयाळी।
चोखामेळा पुत्रही,बसतो फंक्तितही।।

कोणी दिसे तुकोबा,नामू गोराकुंभार।
ब्रम्हविष्णू काव्यांचे ,श्रीरुपी पद्माताई।।

कविताही माझीच ,भावना अंतरीच्या।
मराठीचे शिलेदार चा,झालो वारसही।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा,*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

ज्याच्या अंगी मोठेपण..
त्याला यातना कठिण..
कर्मठांचे जिव्हारी वार..
किती झेलले अपार..
अभंगाची वही,
बुडविली डोही…
उडविली खिल्ली,
कर्मठ भट्टांनी…
चमत्कार म्हणू की,
हा साक्षात्कार..
जी भिजकी वही
जलात तरली…
तीच तुकोबांची गाथा…
जग झुकवी माथा…
लोकहितवादी
क्रांतीकारी संत..
निर्भिड विद्रोही,
निर्धारी निर्मोही..
इंद्रायणी काठचा
थोर वैराग्यमूर्ती…
जगद्गुरू उपाधी,
त्रिभुवनी ख्याती…
तरी त्याशी छळले,
कळले ना मूढा…
तुका केवढा केवढा…?
आरे आकाशा एवढा…
तुका आकाशाएवढा…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

अखंड ज्ञान,भक्तीचा स्त्रोत
आहे संत तुकोबाची गाथा
पूजनीय मानतोय संप्रदाय
तयाचे चरणी नमिती माथा…१

समाजातील दंभावर केलेत
निर्भिड,रोखठोक शब्दप्रहार
जीवन तत्त्वज्ञान कीर्तनातून
प्रबोधनाचा उचललेला भार…२

अन्याय,अत्याचार,ढोंगावर
सडेतोड लिहीले अभगांतून
नैतिकमूल्ये अनुसरण करा
सर्व आपल्या आचरणातून…३

वरचढ ठरते तुकोबाची गाथा
प्रस्थापिता खटकले मनोमन
इंद्रायणी नदीत गाथा बुडवून
होईलच कसे वैचारिक खंडन…४

भिजकी वही,त्यातील अभंग
जनसामान्य हृदयात कोरलेले
जशाच्या तसे प्रकट होत गेले
प्रत्येकाचे ओठावर खिळलेले…५

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*भिजकी वही*

तुकारामांचे अभंग,
टिकाकार ब्राह्मण झाले,
शास्त्रविरुद्ध मानुनी,
निंदा लेखन त्यांनी केले.

तुकोबांनी उपासना केली,
मनोभावे देवाला,
भिजलेली वही बुडविली,
इंद्रायणीच्या प्रवाहाला.

पोथी लागली तरंगाया,
तेराव्या दिवशी पाण्यावर,
संतत्वाचे प्रतीक झाली,
पुनःप्राप्ती चमत्कार!

आजही पिढ्यानपिढ्या,
तुकारामांचे अभंग जिवंत,
त्यांना लाभले अमरत्व,
तेज सदा अढळ त्यात!

समजून घेतले पाहिजे,
पवित्र कधीच नसे नष्ट होत,
संतवाणी युगे अठ्ठावीस,
प्रेरणारूप उगम देत!

*डॉ. बालाजी राजुरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

तारुण्यातली आग म्हणतात
जिवघेणी, जीवदेनी असते
घुसत जातो खंजर, तिर
ह्रदयात चलबिचलं माजते….

नाकापर्यंत जीव डुबलेला
पाण्याची असे पर्वा कुणा
जग काही एक पण सांगेल
आपण फक्त प्रेमात डुबलोय म्हणा….

वादळं, वारे सोसलेला शरीर
शेवटी ह्रदयात फसतं जातो
वाईट – खऱ्याची जाण नाही
मृत्यू समोर तरी हसत जातो….

देऊन अलिंगन, मिठीत घेऊन
समोरासमोर प्रेमाचा खून होतो
डोळ्यात अश्रू उभे राहतात
मात्र प्रेमासाठीचं मौन राहतो….

ह्रदयावरच्या त्या अक्षरावर
फेकली जाते लाल शाही
कागद, पेनाची काय बराबरी
हातात उरते फक्त भिजकी वही….

*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

भिजकी वही तुकोबाची
आहे सार्थक जीवनगाथा
वारकरी संप्रदाय अवघा
टेकवितो भक्तीने माथा….

एक अभंगात करतात
आजही प्रवचन कीर्तन
अभंगाच्या ताकदीनेच
घडते समाज परिवर्तन….

भिजकी वही नाही ती
अंतर्बाह्य विठू माऊली
भक्तीची अखंड ज्योत
भक्तडोई होते सावली…

अवघे जीवनाचे सार
जीवनमार्ग सोपा करी
अखंड नामस्मरणानेच
चुकेल जन्ममरण फेरी…

नाही भिजकी वही
पाण्यावर तरंगलेली
तुकारामाच्या भक्तीची
खरी ताकद ठरलेली…

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

विठू तुझ्या भेटीची
लागलीय जिवा आस
मुखी तुझाच गजर
तुझ्या भक्तीचाच ध्यास

दिंडी पताका घेऊन
पायी निघाला वारकरी
आषाढीची वारी.. वाटतं
करावी एकदा तरी

अनुभवावा वाटतोय
टाळ मुदूंगाचा गजर
तुझ्याच नामस्मरणात
सरावा हर प्रहर

डोळा भरून पाहावं
वाटे..विठू तुझं रे गावं
अनुभवावा वाटतो
तुकोबाचा भक्ती भाव

इंद्रायणीच्या काठीवाटे
जरा शांत.. निवांत बसावे
भिजकी वही तुकोबाची..
तरंगली तिला डोळ्यांनी पाहावे.

*सौ.इंदू मुडे ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

नसे ती भीजकी वही!
असे चिरंतन तत्त्वज्ञान
चिरंजीव आहे गाथा
रचैता तुकोबा महान..

दांभिकता रुढी वाद
अंधश्रद्धा, थोटांडाचा प्रतिकार
सत्य, प्रेम केरला अभंगातून
नामसकीर्तनातरंगी तुकोबा महान…

पचले न सत्यज्ञान कर्मठांना
सनातनी ढोंगी बिथरले
चोरूनिया गाथा तुकोबांच्या
इंद्रायणीत बुडविल्या..

लोकप्रियता गाथांची
लोकमुखी अवगत
अवघ्या गाथा मुखोगत
घेऊन येई शब्दसरस्वती गाथा पूर्ववत..

कवी श्रेष्ठ तुकोबाराया
दूरदृष्टी लेखनाची…
सांगे चराचरावर प्रेम करा
वृक्षवेली असो पक्षी…

साधं सोपं तत्त्वज्ञान
सांगे मनुष्य जीवनाचं सार
तुकोबांचे अभंग होऊन या गाथा
झाले अजरामर…न होणार हद्दपार..

*सौ सुरेखा कोरे, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

कपाटाच्या आतल्या कप्प्यात
दिसली एक भिजकी वही
भूतकाळातील आठवणींची
देऊ लागली ग्वाही ॥

बालपणीचे सवंगडी
स्वच्छंद माझ्याशी खेळू लागले
कट्टी -दो च्या कहाण्या
कारणासहीत सांगू लागले ॥

आईबाबांच्या स्मृतीने
पापण्या ओल्या करू लागली
अनुभवांची शिकवणी
शब्द मनात कोरू लागली ॥

कधी मिलन कधी विरह
कधी आनंद कधी दुःख
आशा-निराशेच्या चक्रीवादळात
आठवांची नदी वाहू लागली ॥

रोज पाने पलटतांना
वाट मला दाखवत असते
संकटकाळात खंबीरपणे
जगणे मला शिकवित असते ॥

प्रत्येकाजवळ असावी
अशीच एक भिजकी वही
गुरु म्हणून देत रहावी
मार्गदर्शनाची ग्वाही ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे