
0
4
0
9
0
3
श्रावणमासी सरी
मनोमनी हर्ष पसरला
पसरला गंध छान गडे
पहा सभोवार हिरवळ
हिरवळ दाटे चोहीकडे ॥
वसुंधरा नटली रे पहा
पहा श्रावणमासी सरीने
निसर्गाचे पालटले रुप
रुप भरले हिरवाईने ॥
फुले डौलती बगीचामध्ये
बगीचामध्ये भ्रमर उडे
मकरंद शोषिती मक्षिका
मक्षिका मनी आनंद गडे ॥
तप्त उन्हाच्या झळा सोसुनी
सोसुनी तृप्त ही वसुंधरा
चिंब भिजुनी हा आसमंत
आसमंत लाजला हासरा ॥
सृष्टी पाहुनी हर्ष मावेना
मावेना पशुपक्षी भूचरी
हिरवळ दाटे चोहीकडे
चोहीकडे वाटे हुरहूरी ॥
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
जि धाराशिव
0
4
0
9
0
3





