0
4
0
9
0
3
शिदोरी
संत्रानगरीत रंगली
काव्यमैफिल भारी
सहवास लेखकांचा
हर्ष दाटला उरी
उधळण शब्दाची
आस्वाद लेखनाचा
मार्ग दावी ज्ञानाचा
सहभाग संमेलनाचा
ज्येष्ठ स्तंभलेखक
सांगे महती कवितेची
मार्गदर्शन नाही तुम्हा
शिदोरी देतोय ज्ञानाची
लिहिते व्हा. वाचक व्हा
संदेश प्रा.पावशेकरांचा
अभिमान वाटतोय आज
मराठीच्या शिलेदारांचा
प्रसंग मराठी गीतांचा
कथन रसिकांजवळी
भाषा सक्षमीकरणास
आग्रह सारस्वत मंडळी
स्वाद जीवनात तुमच्या
येईल कठोर मेहनतीने
सोबत देतोय ज्ञानझरा
स्वीकारा जिव्हाळ्याने
माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ
==========
0
4
0
9
0
3





