नागपूरच्या वारांगणांनी नाकारला ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ
राज्य शासन व पोलीस प्रशासनाचा निषेध करीत योजनेवर बहिष्कार
नागपूरच्या वारांगणांनी नाकारला ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ
राज्य शासन व पोलीस प्रशासनाचा निषेध करीत योजनेवर बहिष्कार
वारागंणानी ज्वाला धोटे यांना बांधली राखी
नागपूर जिल्हा प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
नागपूर: राज्यात महायुती सरकारने ‘लाडकी बहिण’ योजना सुरू केली असून, त्यासाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज केले असून काही जणांनी त्यांच्या खात्यात पैसे आल्याचा दावाही केला आहे. दरम्यान, नागपूरकरच्या वारांगणांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ नाकारला आहे.
वारांगणांनी सांगितले की, काही काळापूर्वी गंगा-जमुनेतील वारांगणांवर शासन व पोलीस प्रशासनाने घोर अन्याय व अत्याचार केले होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. याचा निषेध म्हणून योजनेवर बहिष्कार टाकून लाभ नाकारण्यात आला आहे. रक्षाबंधनानिमित्त विदर्भातील तमाम महिलांनी कस्तुरचंद पार्क येथे एकत्र येऊन माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या प्रतिमेला राख्या बांधल्या.
जांबुवंतराव धोटे यांनी माता-भगिनींना भाऊ मानून वरांगणांच्या संरक्षण व हक्कासाठी लढण्याची जबाबदारी स्वीकारली होती. आता त्यांची मुलगी ज्वाला धोटे हिने वडिलांचा वारसा पुढे नेत ही परंपरा सुरू ठेवली आहे. कस्तुरचंद पार्कमधील ज्वाला धोटे यांच्या रक्षणासाठी सर्व वारांगणांनी तिला राख्या बांधल्या. ज्वाला धोटे म्हणाल्या की, वारांगणा असल्याने समाजात माता-भगिनी सुरक्षित आहेत, अन्यथा कोलकातासारख्या हृदयद्रावक घटना रोज घडतात.
वारांगणा माता भगिनींचा समाज ऋणी आहे. महिलांना सन्मान देऊन हे ऋण फेडण्याची जबाबदारी सर्वांची आहे. विदर्भ विचार मंचचे अध्यक्ष सीए सुनील चोखारे, एड.विलास राऊत, एड. तभाणे, ऍड. शिवराज निर्मळ, डॉ.झेलम, योगेश ठाकरे, मनीष वासे, शंकर बर्मन आदी उपस्थित होते.



