
0
4
0
9
0
3
अस्तित्वासाठी
पिढया न् पिढया लढतेय मी
स्व अस्तित्वासाठी झटतेय मी
नात्यांत विखुरलीय ओळख माझी
माझेच मीपण शोधतेय मी ॥
दिला जनतेला जाणता राजा
रमाई बनून भाग्यविधाता
अहिल्येचे शापीत जीवन
अजूनही का जगते मी ॥
सृजनाची जननी मी
दुर्जनांचे करूनी मर्दन
धिंडवडे माझ्याच अब्रूचे
अजूनही का सोसतेय मी ॥
यशाच्या गाठल्या दाही दिशा
चेतवून मनीच्या नव आशा
क्षितिज कवेत घेणारी
चैतन्यदायी वसुधा मी ॥
अस्तित्वासाठी लढता लढता
स्वत्वाला शोधलेय मी
मीच माझी भाग्यविधाता
कणखर बनून जगणार मी ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=========
0
4
0
9
0
3





