0
4
8
2
9
0
झंझावात
दिस कसा तरी गुजरतो
पण कटतं नाही रात
सदा न कदा डोक्यात असतो
तिच्याच विचारांचा झंझावात
झालं गेलं विसरून
पुन्हा सुखे जगावे म्हणतो
पण राहून राहून तिच्याच्य
विचारांचा मौसम बनतो
मैफिलीत जरी असतो
तरी त्यांच्यात मी नसतो
देह जरी उपस्थितांमध्ये
आत्मा कुठे औरच असतो
सारेच केले उपाय
सारेच वाया गेले
विचारांचे दृष्टचक्र
न संपणार न संपले
का? नशीबही अशा स्थितीत
काढत नाही कोणती वाट
समजत नाही कधी संपणार
हा विचारांचा झंझावात
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड,नागपूर
=========
0
4
8
2
9
0



