Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखभंडाराविदर्भसाहित्यगंध

“आभाराची शब्दफुले’; वनिता गभने

0 4 8 2 9 0

आभाराची शब्दफुले’; वनिता गभने

माहेरचा आहेर
आज पुन्हा आला
मयुर मम मनाचा
बहु हर्षित झाला

निशाची गर्द सावली नभावरून अजून हटलेली नव्हती. रवीची उगवतीची लालिमा दूरवर कुठेही दाटलेलेही नव्हती. अशा अजाण वेळेच्या मध्यांतरी आदरणीय सरांचा, ‘फोटो पाठवा’ मेसेज येतो, तेव्हा सरांच्या निरपेक्ष, अहैतुकी, कुशल कार्यतत्परतेपुढे मस्तक माझा नत नत होतो. आदरणीय राहुल सरांच्या, आ. सविता ताईसोच्या या निरपेक्ष कार्यप्रणालीला शब्दात मापणे माझ्यासाठी तरी खूप खूप कठीण आहे. या शिलेदार समूहातील सर्व सहप्रशासकांचे कार्य देखील तितकेच बहुमुल्य आहे. घर ,नोकरी, आरोग्य तक्रारी सांभाळून समूहाला कार्यरत ठेवण्यासाठीची सर्वांची धडपड वाखाणण्याजोगीच आहे. या सर्वांच्या कार्याला सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम.

आज मी जे काही आहे ते सर्व माझ्या शिलेदार माहेरची देणं आहे. माझ्या सारख्या सुरवंट अळीला पंख आणि नभ इथेच मिळाले. माझ्या शब्दाशब्दाला या माहेरचा मोरपंखी स्पर्श आहे.

खरे बघता आजन्म विद्यार्थीनी मी इथली. शिकणे हाच माझा धर्म- कर्म… तरीही आदरणीय सविता ताईसो, आदरणीय आशा ताईसो सारख्या उच्च विद्याविभूषित माझ्या अल्पशिक्षित लेखणीची भरभरून स्तुती करतात; किंवा सलाम ठोकतात. तेव्हा मला यांच्या महान औदार्यापुढे कुठल्या शब्दात व्यक्त व्हावे कळत नाही. हे तर असे वाटते जणू, ‘महाकाय हत्तीने म्हणावे, ‘मुंगी माझी प्रेरणास्थान आहे’. आणि सूर्याने म्हणावे, ‘काजवा माझा उर्जास्रोत आहे.’!!! यातला गमतीचा विषय सोडला तर खरेच यांच्या चांगुल मनाच्या विशालतेपुढे मला फक्त गहिवरून येते आणि लेखणीला बळ मिळते. या स्नेहसरीसाठी आजन्मच ऋणात मी.

बालकाव्य हा माझा आवडता प्रांत, कारण यात तात्विक, सात्विक, मार्मिक कुठलेही तत्वज्ञान नाही.. ( हे तत्वज्ञान माझ्या डोक्याबाहेरचे)
बालकाव्य म्हणजे केवळ निर्मळ निरागस मनाचे साधेसुधे बालभाव.. असेच साधेसरळ बालभाव मी काल ‘ लिंबू सरबत’ मध्ये ओतले व ते सरबत परीक्षकांना भावले त्याबद्दल मी परिक्षकांची ऋणी आहे. माझ्या ‘ लिंबू सरबत’ बालकाव्याला सर्वोत्कृष्टच्या पोस्टरवर सन्मानित करून गौरवण्यात आल्याबद्दल समूहाचे आधारवड, सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर, समूहाच्या सचिव आ. पल्लवी ताईसो, मुख्य प्रशासक आ. सविता ताईसो, सहप्रशासक आ. वैशाली ताईसो, आ. स्वाती ताईसो, आ. तारका ताईसो, आ. वृंदा ताईसो, आ. शर्मिला ताईसो, आ. प्रतिमा ताईसो, आ. कुमठेकर सर, आ. लांडगे सर, आ. खोब्रागडे सर , समूहाचे तसेच माझे प्रेरणास्रोत आदरणीय विष्णू दादा सर्व परिक्षकांचे मी आभार मानून ऋणात राहू इच्छिते. मराठीचे शिलेदार समूहाचे सर्व शिलेदार ताई दादा जे नेहमीच माझ्या लेखणीचे कौतुक करून मला लिखाणात बळ देतात त्या सर्वांचीच मी खूप खूप ऋणी आहे.

सौ वनिता गभणे
आसगाव जि.भंडारा
सदस्या मराठीचे शिलेदार समूह

3.3/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे