0
4
8
2
8
4
शब्दव्यूह
सखे तुझ्या शब्दव्यूहाने
घातली मनाला भुरळ
टाकते असे शब्दजाळ
की मन होतंय हळहळ.
मोहक शब्दजाळयात मी
अडकत गेलो क्षणोक्षणी
प्रीत जडली जीवापाड
वरले तुलाच मनोमनी.
थोड्याच दिवसांत तुझं
मला अवहेरून बोलणं
जाणवतं होतं तुझ्यात
माझचं खोलवर गुंतणं.
क्षणिक समाधानाचा
हेरला कावेबाजपणा
शब्दव्यूहात फसवून
तू देत होतीस यातना.
नाहीच होणार अभिमन्यू
घातली अंतर्मनाने साद
डाव ओळखून मी तुझा
सोडला आपसुकच नाद.
सुजाता सोनवणे
सिलवासा दादरा नगर हवेली.
=========
0
4
8
2
8
4



