Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

तळोदा, नंदुरबार जिल्हा पोलीस मित्र राज्यस्तरीय मेळावा

वसुधा वैभव नाईक, पुणे.

0 4 0 9 0 3

तळोदा, नंदुरबार जिल्हा पोलीस मित्र राज्यस्तरीय मेळावा.

भव्य कार्यक्रम, भरीव राज्यस्तरीय सोहळा

तळोदाला जाण्यासाठी पुण्यापासून अंदाजे नऊ ते दहा तास लागतात. त्यात माझी तब्येत जरा नरम गरम होती. पाय सुजले होते आणि उजव्या हाताला फ्रोजन शोल्डर झाल्यामुळे तो हात काम करेनासा असा झालेला आहे. शुगर एकदम चारशे वर गेल्या ना डॉक्टरांनी जरा आराम करायला सांगितला होता.सर्व टेस्ट केल्या. या कारणास्तव जरा मी तिथे यायला जमेल की नाही सांगता येत नव्हतं. मा. हेंद्रे सरांचा फोन आला.मा. शिवाजी सरांचा फोन आला. मा.शेटे सरांनी विचारल येणार आहात का तुम्ही? मी सर्वांना माझ्या तब्येतीची चाललेली कुरकुर सांगितली. एक मन म्हणत होते तू महाराष्ट्राची महिला अध्यक्ष असल्याने तुला जाणे भाग आहे.

पण तब्येतीपुढे काही सांगता येत नव्हते. मा. रवींद्र सूर्यवंशी सरांचा, आपल्या संस्थापकांचा फोन आला.’ ताई बघा काय करायचं ते तब्येत सांभाळून आला तर बरे होईल.’ या शब्दांमध्ये खूप ताकद आहे. त्यांच्या या शब्दांने मी भारावून गेले. त्यांना देखील मी तब्येतीची तक्रार सांगितली. परंतु माझं मन एक म्हणत होतं की तू कार्यक्रमाला गेलीस तर तुझं सर्व काही ठीक होणार आहे. तुझी तब्येत उत्तम राहणार आहे. कारण माझं रक्त सळसळत होतं तिथल्या युवा क्रांतीतील पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना भेटण्यासाठी. शेवटी डॉक्टरांचा सल्ला घेतला. दोन दिवस इंजेक्शन घेतली. पेन किलर खाल्ल्या तीन दिवस. आणि माझाच बहिणी, बांधवांना भेटण्यासाठी मनाची आणि शरीराची तयारी केली.

मा. रवींद्र सर,मा. हेंद्रे सर, मा. शेलार सर, मा. शेटे सर, सर्वांच्या विनंतीला मान देऊन तिथे येण्याचे पक्क ठरवले. मनाची चलबिचल पळवून लावली. माझ्या लेकीला येण्यासाठी तयार केलं. तशी नातवंड लहान आहेत पण तरीसुद्धा त्यांना बरोबर घेतलं. दि. 15/03/2025 ला सकाळी सातला सर्वजण आवरून बसलो. पण माझा स्टुडन्ट जो ड्रायव्हर आहे त्याला जरा वेळ लागला. त्याची तब्येत जरा बरोबर नसल्याने तो आराम करत होता. तो बरोबर नऊ वाजता आला. आणि आम्ही तळोद्याकडे येण्यास प्रस्थान केले. या तालुक्याचे नाव मी खरच नुसते ऐकले होते. येण्याचा संबंधच आला नाही नंदुरबार जिल्हा माहित होता.

मागे ‘आदर्श शिक्षक’ म्हणून तिथे मला पुरस्कार होता; पण मी तिथे पोहोचू शकले नाही. कारण खूप लांब होत म्हणून. पण मला ‘युवा क्रांतीचा ‘ हा कार्यक्रम चुकवायचा नव्हता आणि माझं मन मला सांगत होतं की जर का तू या कार्यक्रमाला गेलीस तर तुझी तब्येत उत्तम ठणठणीत होणार आहे. आणि कार्यक्रम चुकवलास तर तू आणखी जास्त आजारी पडणार आहेस… आणि त्यामुळे आम्ही निघालो. लहान मुलं बरोबर असल्याने घरूनच येताना मेथीचे ठेपले, तिखट आणि मिठाची मठरी, ब्रेड जाम घेतले. प्रवासास मस्त सुरुवात झाली. साधारण एक वाजता आम्ही अशोक हॉटेल इथे थांबलो. नाष्टा केला. फोटो सेशन झाले. लहान मुलांच थोडं खेळणं झालं. साधारण अर्धा तासाने आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. माननीय रवींद्र सरांचा फोन आला. वसुधा ताई कुठपर्यंत पोहोचलात? मी त्यांना सांगितले आम्ही कुठपर्यंत पोहोचलो.

त्यांचा फोन आला पण मनाला खूप छान वाटले. ‘मायेचे पंख पसरवणारे एक वटवृक्ष ‘आपल्या पाठीशी खंबीर आहे हे जाणवले. मा. कोळी सरांचा फोन झाला.. ताई कुठपर्यंत आला आहात? हा फोन घेतल्यानंतर खरंच भरून आलं. एवढी काळजी घेणारे लोक आपल्याला कुठे मिळणार आहेत आजकालच्या जमान्यात. हा संवाद मनाशीच माझा मी केला. प्रवास चालूच होता. संध्याकाळी पासून नंतर चहा पाण्यासाठी थोड थांबलो. माझ्या स्टुडन्ट ड्रायव्हरला जरा विश्रांती दिली. साधारण अर्ध्या तासाने परत प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा एकदा आपल्या मा. संस्थापकांचा फोन आला. खरंच किती काळजी करतात वर आपले मा. संस्थापक. मनाला भावणारे व्यक्तिमत्व. मा. कोळी सरांशी संपर्क करून लोकेशन मागवून घेतले. त्यांनी लाईव्ह लोकेशन पाठवल्यामुळे मला ते शेअर करता येईना. मग मी मा.हेंद्रे सरांना फोन केला. सरांनी ताबडतोब मला तिथले करंट लोकेशन पाठवले.

आणि आम्ही रात्री 8.30 च्या दरम्यान करंट लोकेशन वरती पोहोचलो. खरं सांगते दिवसभर प्रवासाचा अजिबात कंटाळा आला नाही.थकवा जाणवला नाही. करंट लोकेशन वर पोहोचलो तिथे चिरायू विश्रांतीगृह दिसले. मी परत कोळी सरांना फोन केला. त्यांनी ताबडतोब मा. चित्ते सरांना पाठवून दिले आणि आम्ही कार्यक्रम स्थळी जाऊन पोहोचलो. कार्यक्रम ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वांशी प्रत्यक्ष भेट झाली. मा. रवींद्र सरांचा फोन आला. सुखरूप पोहोचलो हे त्यांना समजले. मी तिथे गेल्यानंतर मला भेटायला आलेले सर्व पदाधिकारी खूप उत्सुक दिसले. तळोद्याची टीम तयारच होती स्वागतासाठी. सिंदखेडच्या मॅडमनी मस्त मिठी मारत गळा भेट घेतली. सर्व पदाधिकाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली. केवढे हे प्रेम सर्वांचे. खूप, खूप छान वाटले. हे मिळालेले प्रेम शब्दात व्यक्त करू शकत नाही. हॉल पाहिला, व्यवस्था पाहिली. सुंदर नियोजन होते.

जेवणाची व्यवस्था उत्तम केली होती. पदार्थ मोजकेच पण रुचकर होते. विशेष म्हणजे बुफे न लावता पंगत ठेवलेली होती. केवढा हा मान सन्मान. इथेच मा.जयश्रीताई अहिरे मॅडम व त्यांची टीम भेटली. पूर्वी आम्ही भेटल्यामुळे मला त्या माहीत होत्या. त्यांचा प्रेमळ स्वभाव माहित आहे. जेवणानंतर पुन्हा एकदा आम्ही विश्रांती गृहाकडे प्रस्थान केले. बरोबर माननीय चित्ते सर होतेच. माझी फॅमिली येणार आहे म्हटल्यावर माझी स्वतंत्रपणे व्यवस्था केली. फॅमिली असल्याने त्यांनी उत्तम सोय केलेली होती. त्यांनी हॉटेलमध्ये सांगितले की या मॅडम कडून पैसे घ्यायचे नाहीत. पैसे मी भरणार आहे. मी म्हटले नको सर असे मी भरते.. तर मला नाही तिथे सर म्हणाले “आहो मॅडम तुम्ही पुण्याहून आलात तुमच्या सेवेची आम्हाला संधी द्यावी. ” त्यांच्या या एका वाक्याने खरंच मन भरून आले माझे. केवढे हे आदरातिथ्य!

दि. 16/03/2025 सर्व आवरून शेजारच्या रूम मध्ये डोकावले. रूम उघडतात मा.अमृता ताई पठारे दिसल्या. पटकन आम्ही गळा भेट घेतली. मा. वैशालीताई भेटल्या आम्हीही गळा भेट घेतली. त्यांच्या नजरेतून प्रेम दिसून येत होते. मा.मीनाताई गवारे मॅडम भेटल्या.मा. रोकडे ताई भेटल्या, आणि बाकी सर्व लेडीज तिथेच होत्या. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रेम आदर भावना दिसून येत होती. भेटण्याची ओढ काय हे समजत होते . युवा क्रांती मधील हे प्रेम खूप अनमोल आहे. सर्वांनी छान आवरले आणि आम्ही सर्वांना बाहेर पडलो. मी डायरेक्ट कार्यक्रम स्थळी पोहोचले. कार्यक्रम सगळे जातानाच लक्षात आले की माननीय वर्षाताई सुद्धा आलेल्या आहेत.(ही माझी बहीण ) आनंद वाटला आपल्या टीम मधले तीन साथीदार इथे होते. कार्यक्रम स्थळी गेल्यानंतर तिथे उत्तम तयारी चालू असताना दिसली. सर्व भगिनींचा ड्रेस कोड उत्तम होता.मस्त फुलांची आणि रंगांची उधळण करत रांगोळी घातलेली होती . मा. हेंद्रे सरांची सूत्रसंचालनाची उत्तम तयारी झालेली होती. आम्ही दोघांनी जरा गप्पा मारल्या.

मा. संस्थापकांसाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. भारत माता,वासुदेव असे पारंपारिक वेशभूषा केलेली पात्रे स्वागतासाठी सज्ज होती. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या स्वागत मस्त वाजत गाजत केले गेले.सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. स्वागत झाले. मान्यवरांनी व्यासपीठावर बसण्याचे आमंत्रण मा. हेंद्रे सरांनी केले. व्यासपीठावर सर्व स्थानापन्न झाले. हॉल पूर्ण भरलेला होता. सर्वांचे भगवे फेटे झळकत होते. फेट्यांचा एक विशेष म्हणजे, प्रत्येकाच्या पदा नुसार त्यांनी फेटे चॉईस करून ठेवले होते. हॉल पूर्ण भरलेला होता. एका सुंदर अशा प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम पदाधिकारी यांचे सत्कार झाले.

विविध पदाधिकाऱ्यांची उदबोधनपर भाषणे झाली. काही भाषणानंतर गुण गौरव सोहळा घेतला. पुन्हा काही पदाधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.मा. शिवाजी शेलार,मा. ह. भ. प. अहिरे सर, मा. नाना कापडनिस सर, मा. नानासाहेब गडे, मा. पत्रकार सुभाष शेटे, मा. अमृता ताई पठारे, मा. जयश्री ताई अहिरे, मा.मीनाताई गवारे, मा. वैशालीताई बांगर,मा. वर्षा नाईक, मा. वैशाली गायकवाड इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर, भाषण झाली. सौ. वसुधा ताईने काव्य सादर केले.

सरते शेवटी मा. रवींद्र सर आपले युवा क्रांतीचे खंबीर नेतृत्व करणारे संस्थापक यांनी मार्गदर्शन पण उद्भवतंत केलेस पण पूर्ण सभेला हलवूनही टाकले. राष्ट्रीय पातळीवर काही पराधिकाऱ्यांची पदोन्नती जाहीर केली.. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप कौतुक करते. आपल्या कामाची पावती मिळाली की आपल्याला खूप आनंद होतो. लढण्याचे बळ प्राप्त होते. शाब्बासकिची एक थाप आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देते. हेच उत्कृष्ट काम आपले संस्थापक करत आहेत. त्यांना माझा मानाचा मुजरा या व्यक्तिमत्त्वाला. संस्थापक यांचे बहारदार भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. मा. हेंद्रे सरांचे अतिशय उत्तम आणि बहारदार सूत्रसंचालन झाले. मस्त फोटो सेशन झाले. मिष्टनाचे सेवन केले. सर्व तळोदा टीमचे खूप, खूप आभार. सर्वांची नावे लक्षात ठेवून घेणे शक्य नसल्याने, पण तरीही कोणाचे नाव राहिले असेल तर क्षमस्व! आपल्या तळोदा टीमचं, युवा क्रांतीच्या या टीमला खूप खूप शुभेच्छा देते, आभार मानते, केलेल्या कामाचे कौतुक करते, आता मी थांबते…!

वसुधा वैभव नाईक, पुणे.
युवा क्रांती संघटना.
पोलीस मित्र, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष.
राष्ट्रीय किसान विकास मंच-
महाराष्ट्र राज्य सहकार्याध्यक्ष.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे