0
4
8
2
9
4
याचना
वैरी झाला जरी प्राक्तन
नको घेऊस गळफास
कर दिलेय ना दोन देवाने
कर परिस्थितीशी जुगाड
भर आत्मविश्वास मनी
नांगर दुबळी मनोभूमी
अंकुरेल नवचैतन्य उरी
होईल हिरवी स्वप्नभूमी
का करतो याचना कुणाची?
तू रवीतेज बन तुझाच विधाता
आहे श्वास जोवर देहात
कर सार्थक या जीवनाचा
तारका रुखमोडे
अर्जुनी जि.गोंदिया
===========
0
4
8
2
9
4



