0
4
8
2
9
3
कावळ्यांची शाळा
काव काव करीत
कावळे झाले गोळा
बाभळीच्या झाडावर
कावळ्यांची शाळा .
नको खडू नको फळा
गाऊ गोड गाणी
आज फक्त पाठ करू
नव्या नव्या म्हणी.
गुरुजींनी सुरू केला
अभ्यासाचा धडा
वाचला मग त्यानी
काळया रंगाचा पाढा .
बाळ काही जेवेना
चिऊ काऊ येरे
बाळा संगे तूप रोटी
खाऊन जा रे .
किती करू विनवणी
दार उघडेना चिमणी
काट्याकुट्याची जरी
बरी साधी रहाणी .
विमल धर्माधिकारी
तालुका वाई,जि.सातारा
=========
0
4
8
2
9
3



