
0
4
0
8
9
0
दिलदार
प्रश्न हा नाहीच की
किती मोठे घरदार
प्रश्न हाच आहे की
कोण किती दिलदार..//
आतून पोकळ असणे
वरून दिसणे भरदार
बीन कामाचा दिखावा
मुळीच नसतो दमदार.. //
विवेकशून्य विचारांचे
वाचाळवीर भारोभार
सत्वशील आचारांचा
आहेच कुठे कारोभार..,? //
शस्रासारखेच शब्दही
इथे अनेकांचे धारदार
भाषाशास्त्र जाणणारे
आहेत कोण जाणकार?.. //
इथे हळव्या मनावर
घाव गहिरे अनिवार
छिन्न विच्छिन्न ह्रदय
होतात वार आरपार…//
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
4
0
8
9
0





