लेखणीही थिरकली हर्षवलय साकारताना….!; वैशाली अंड्रस्कर
मराठीचे शिलेदार समूहाच्या ऋणात मी
लेखणीही थिरकली हर्षवलय साकारताना….!; वैशाली अंड्रस्कर
होय, आवडतं मला हसायला. कधी स्मित तर कधी खळखळून चारचौघांत गप्पा मारताना.कधी एखादं साहित्य वाचताना. कधी रडावसंही वाटतं भरभरून. कधी आनंदाने उचंबळून तर दुःखाचा सागर पिऊन. कारण मी आहे भावनांची धनी. भावनांच्या लाटांवर थिरकते माझे आयुष्य. जे नाहीच एखादे डबके तर ती आहे नदी. सारंकाही आपल्यात सामावून सागराला जाऊन भिडणारी अन् सागर बनून परत लाटांनी किनाऱ्यावर खेळणारी. कारण हर्षवलय खुलवते माझे व्यक्तिमत्व. हर्षवलय जाणवून देते माझे अस्तित्व….!
काल ‘मराठीचे शिलेदार’ समूहात माननीय राहुल दादा पाटील यांनी कविता चारोळी समूहात ‘हर्षवलय’, विषय दिलेला. सध्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, शालेय स्पर्धा आणि तब्येतीची कुरबुर अशा एक ना अनेक अडचणींमुळे समूहात इच्छा असूनही फारसे लेखन होत नाही. मात्र अंतरात लेखनाची उर्मी दाटत असते. त्याच उर्मीमुळे आणि हर्ष, आनंद हे आपल्या जीवनाला नवसंजीवनी देत असल्यामुळे अगदी सहजपणे ‘हर्षवलय’, ही रचना आकारास आली.
ही रचना सर्वोत्कृष्ट ठरवून सन्मानित केल्याबद्दल माननीय मुख्य प्रशासक व आयोजक राहुल दादा पाटील, प्रशासक व मुख्य परीक्षक सौ. सविता पाटील ठाकरे, सचिव सौ. पल्लवी ताई पाटील, विश्वस्त अशोकदादा लांडगे आणि अरविंद दादा उरकुडे यांचे मनापासून आभार…!
आणि माझ्या सर्वोत्कृष्ट रचनेचे कौतुकपर अभिनंदनीय शुभेच्छा देणारे माझे सर्व शिलेदार दादा-ताई आपणा सर्वांचेही हृदयस्थ आभार…!
सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





