Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

भावनेची जपणूक करतांना ‘गहिवरले क्षणही’: वृंदा करमरकर

सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 9 0

भावनेची जपणूक करतांना ‘गहिवरले क्षणही’: वृंदा करमरकर

सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

मानवी जीवन हे सुखदु:खाने भरलेले आहे.जीवन आणि मृत्यू यामध्ये एका श्वासाचे अंतर असते. जीवन व मृत्यू आपल्या हातात नाही, तर ती गोष्ट जगन्नियंत्याच्या हाती आहे.आपल्या हाती फक्त जगणे आहे. जीवनात काही क्षण असे येतात की मन नकळत गहिवरते.हे गहि वरले क्षण आनंदाचेही असू शकतात आणि दुःखाचेही. अशा क्षणांमध्ये शब्द अपुरे पडतात आणि डोळ्यांतून भावना ओघळू लागतात. जीवनातील हे क्षण आपल्याला अधिक संवेदनशील बनवतात.

आमच्या शेजारचे देशमुख कटुंब. नुकताच त्यांचा मुलगा आकाशचे लग्न झाले.आमचे संबंध घरच्या सारखेच आहेत. लग्नप्रसंगी देशमुख वहिनींच्या डोळ्यांत पाणी आले. तो आनंदाचा गहिवर होता. आकाश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नाला पंधरा दिवस होतात तोच त्याला सीमेवर जावे लागले. नववधू इथेच होती. त्यावेळी आम्ही पण गेलो होतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी देशमुख वहिनींनी त्याचे औक्षण केले. तो जाऊन आठवडा होताच बातमी आली शत्रूने केलेल्या गोळीबारात आकाशला वीरमरण आले. देशमुख कुटुंबावर तर आभाळ कोसळलेच. आम्ही ही हतबलपणे रडत होतो. असे वाटत होते, ‘क्षणही गहिवरले’ होते आकाशला अग्नी देताना.

जीवन हा आसू आणि हासू यांचा खेळ आहे.आईने पहिल्यांदा बाळाला कुशीत घेतलेला क्षण,अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर यश मिळाल्यावर डोळ्यांत आलेले आनंदाश्रू, किंवा दूर गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण हे सर्व गहिवरले क्षणच असतात. कधी एखादे गाणे किंवा प्रसंग अचानक मनाला स्पर्श करून जातो आणि हृदय भरून येते. अशावेळी मन शांत होते,पण भावनांनी मनात गर्दी केलेली असते.

हेच गहिवरले क्षण आपल्याला नात्यांची जाणीव करून देतात. आपल्याला कोण प्रिय आहे, काय महत्त्वाचे आहे, हे अशाच क्षणांत उमगते. दुःखाच्या वेळी आलेले अश्रू मन हलके करतात, तर आनंदाचे अश्रू समाधान देतात. जीवनाच्या धावपळी त हे क्षण थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतात. म्हणूनच गहिवरले क्षण आपल्याला भावना जपायला, नाती घट्ट करायला आणि जीवन अधिक अर्थपूर्ण रीतीने जगायला शिकवतात. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘गहिवरले क्षणही’ हा विषय भावनाशील आहे. शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. राहुलसरांनी मला परीक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे