
0
4
0
8
9
0
रानमेवा
हिरव्या हिरव्या झाडाची
चिंच चटकदार
आंबट गोड बोरं
आवडतात फार फार…
गोड- गोड खिरण्या
हिरडा,बेल गुणकारी
कवठ आणि करवंद
रंगत आणती न्यारी…
येरोण्या,चारोळी, टेंभरं
बेहडा आणि आवळा
आरोग्यदायी रानमेवा
चला करूया गोळा…
जगवूया ही झाडे
जावू नयेत सरून
रानातील रानमेवा
खावे मन भरून….
आशा कोवे-गेडाम
वणी जि.यवतमाळ
============
0
4
0
8
9
0





